Video: 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी घेऊन सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला गौरव खन्ना, प्रणित मोरेनेही घेतलं बाप्पाचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:06 IST2025-12-11T16:05:38+5:302025-12-11T16:06:16+5:30
'बिग बॉस १९'चा विजेता ठरल्यानंतर गौरव ट्रॉफी घेत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गेला होता. बाप्पाच्या चरणी ट्रॉफी ठेवत त्याने आशीर्वाद घेतले.

Video: 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी घेऊन सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला गौरव खन्ना, प्रणित मोरेनेही घेतलं बाप्पाचं दर्शन
Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. टीव्ही सुपरस्टार गौरव खन्ना यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला. गौरव खन्नाने 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. मोठ्या हुशारीने, तल्लख बुद्धीने आणि संयमाने गौरवने 'बिग बॉस'चा खेळ खेळला आणि शेवटपर्यंत तो टिकूनही राहिला. 'बिग बॉस १९'चा विजेता ठरल्यानंतर गौरव ट्रॉफी घेत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गेला होता. बाप्पाच्या चरणी ट्रॉफी ठेवत त्याने आशीर्वाद घेतले.
गौरवसोबत मृदुल तिवारी आणि प्रणित मोरे यांनीदेखील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. मंदिराबाहेर गौरव, मृदुल आणि प्रणित यांना स्पॉट करण्यात आलं. पापाराझींच्या कॅमेऱ्यात ते कैद झाले. गौरवने त्याची 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी कॅमेऱ्यासमोर फ्लॉन्ट केली. बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर गौरवने मीडियाला प्रसादही वाटला. सिद्धिविनायक मंदिराबाहेरचे गौरवचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये गौरव खन्नासह प्रणित मोरे, फरहाना भट, अमाल मलिक, तान्या मित्तल यांनी जागा मिळवली होती. गौरव खन्नाने ट्रॉफीवर नाव कोरलं तर फरहाना उपविजेता ठरली. प्रणित मोरेला तिसऱ्या, तान्याला चौथ्या आणि अमालला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.