गौरव खन्नाला बिग बॉसने गंडवलं? ना गाडी मिळाली ना ५० लाख, अभिनेता म्हणाला- "खरं सांगायचं तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:32 IST2026-03-11T13:32:09+5:302026-03-11T13:32:38+5:30

'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीसह गौरवला ५० लाख रुपये आणि एक गाडीही बक्षीस म्हणून देण्यात येणार होती. मात्र शो संपून महिने लोटले तरी अजून गौरव खन्नाला ट्रॉफी सोडून यातलं काहीच मिळालेलं नाहीये. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने याचा खुलासा केला आहे. 

bigg boss 19 winner gaurav khanna revealed he did not get any prize money and car yet | गौरव खन्नाला बिग बॉसने गंडवलं? ना गाडी मिळाली ना ५० लाख, अभिनेता म्हणाला- "खरं सांगायचं तर..."

गौरव खन्नाला बिग बॉसने गंडवलं? ना गाडी मिळाली ना ५० लाख, अभिनेता म्हणाला- "खरं सांगायचं तर..."

Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' हे पर्व काही महिन्यांपूर्वीच संपलं. त्यानंतर बिग बॉस मराठी ६ सुरू झालं होतं. टीव्ही अभिनेता असलेला गौरव खन्ना हा 'बिग बॉस १९'चा विजेता ठरला होता. 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी गौरवने त्याच्या नावावर केली होती. 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीसह गौरवला ५० लाख रुपये आणि एक गाडीही बक्षीस म्हणून देण्यात येणार होती. मात्र शो संपून महिने लोटले तरी अजून गौरव खन्नाला ट्रॉफी सोडून यातलं काहीच मिळालेलं नाहीये. नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने याचा खुलासा केला आहे. 

गौरवने त्याच्या युट्यूबवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने चाहत्यांच्या काही प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. यामध्ये एका चाहत्याने गौरवला "बिग बॉसमध्ये जे गिफ्ट मिळणार होते ते मिळाले का? प्राइझ मनी आणि गाडीचं काय झालं? टीव्ही मिळाली की नाही?", असा प्रश्न केला होता. चाहत्याला उत्तर देताना गौरव खन्ना म्हणाला, "तुम्हाला तर सगळंच माहीत आहे. या सगळ्या गोष्टींना खरं तर थोडा वेळ लागतो. खरं सांगायचं तर मला काहीच मिळालेलं नाही. पण मला खात्री आहे की या गोष्टी नक्कीच मला मिळतील. कारण त्यांचेही काही नियम आहेत. मिळणारच नाही असं होणार नाही. पण थोडा वेळ लागेल". 

गौरव खन्ना हा लोकप्रिय हिंदी टेलिव्हिजन अभिनेता आहे. कुमकुम, ये प्यार ना होगा कम, ब्याह हमारी बहु का, जीवनसाथी अशा अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. अनुपमा या मालिकेमुळे गौरव खन्ना प्रसिद्धीझोतात आला होता. त्यानंतर हिंदी बिग बॉसमुळे तो सध्या चर्चेत आहे. गौरव सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. 

Web Title: bigg boss 19 winner gaurav khanna revealed he did not get any prize money and car yet