लग्नाला ९ वर्षे, तरीही नकोय बाळ; ट्रॉफी जिंकून घरी परतल्यानंतर पत्नीच्या निर्णयावर गौरव खन्ना म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 11:26 IST2025-12-09T11:25:49+5:302025-12-09T11:26:13+5:30
Bigg Bossची ट्रॉफी जिंकून घरी परतल्यानंतर पत्नीच्या निर्णयावर गौरव खन्नाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

लग्नाला ९ वर्षे, तरीही नकोय बाळ; ट्रॉफी जिंकून घरी परतल्यानंतर पत्नीच्या निर्णयावर गौरव खन्ना म्हणाला...
टीव्हीचा 'सुपरस्टार' गौरव खन्नाने 'बिग बॉस १९'चं विजेतेपद पटकावलं. गौरव खन्नाला यावेळी सलमान खानच्या हस्ते चमचमती ट्रॉफी मिळाली. याशिवाय ५० लाख रुपये प्राईज मनी मिळाले. गौरवसाठी वर्ष २०२५ खास ठरलं. गौरव खन्नाने यंदा दोन रिअॅलिटी शो जिंकले. 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'नंतर 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर त्याने नाव कोरलं. 'बिग बॉस'ची ट्रॉफी जिंकण्याचं गौरव खन्नाचं स्वप्न पूर्ण झालं. पण त्याच्या आयुष्यातील एक मोठं स्वप्न मात्र अपूर्णच राहणार आहे. ते म्हणजे बाप होण्याचं. गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा यांच्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. पण, आकांक्षाला मुलं नको आहे. आकांक्षा चमोला हिने बिग बॉसच्या घरात स्पष्ट केले होते की, ती सध्या तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत असल्याने आई होण्यास इच्छुक नाही. या निर्णयामुळे आकांक्षाला मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अनेक लोकांनी तिच्या करिअर-केंद्रित भूमिकेवर टीका केली. या सर्व टीकेवर आता 'बिग बॉस' विजेता गौरव खन्नाने प्रतिक्रिया दिली आहे
गौरवने ट्रॉफी जिंकून घरी परतल्यानंतर पूर्णपणे आपल्या पत्नीच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. गौरव खन्नाने न्यूज १८ शी बोलताना समाजाच्या दुटप्पी विचारसरणीवरच प्रश्नचिन्ह उभे केले. त्याने स्पष्टपणे सांगितले की, तो केवळ पत्नीला पाठिंबा देत नाही, तर तो तिच्या निर्णयाशी पूर्णपणे सहमत आहे. गौरव म्हणाला, "आपण नेहमीच असे का गृहीत धरतो की पत्नींनी नेहमीच त्यांच्या पतींना पाठिंबा द्यावा? पतींनी त्यांच्या पत्नींना पाठिंबा देऊ नये का? आपणही आपल्या जोडीदारांसाठी उभे राहून त्यांना पाठिंबा दिला पाहिजे".
पुढे तो म्हणाला, "जर माझी पत्नी सध्या एखाद्या गोष्टीसाठी तयार नसेल, तर मी स्वतःला त्यासाठी तयार मानत नाही. मी हे फक्त माझ्या पत्नीला मुलं नको आहे, म्हणून बोलत नाही. तर मी तिच्याशी सहमत आहे म्हणून बोलत आहे" गौरव म्हणाला, "मी खूप आनंदी आहे. मी माझ्या पत्नीवर इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त प्रेम करतो. असा विचार जर आणखी १०-१५ लोकांनी केला, तर जग थोडे चांगले होऊ शकते".
आकांक्षा गौरव पेक्षा १० वर्षांनी लहान
गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांनी २०१६ मध्ये लग्न केले. दोघांची भेट एका ऑडिशनमध्ये झाली होती. त्यांच्या वयात बरेच अंतर आहे. आकांक्षा गौरव पेक्षा १० वर्षांनी लहान आहे. अभिनेता ४३ वर्षांचा आहे, तर आकांक्षा ३४ वर्षांची आहे. पण, वयातील मोठं अंतर त्यांच्या नात्यात कधीही अडथळा ठरलं नाही.