Bigg Boss 19 ची ट्रॉफी जिंकताच गौरव खन्नाची पहिली पोस्ट समोर, चाहत्यांचे आभार मानत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 10:01 IST2025-12-08T10:00:46+5:302025-12-08T10:01:30+5:30
'बिग बॉस १९' जिंकल्यानंतर गौरव खन्नाची पहिली पोस्ट समोर आली आहे.

Bigg Boss 19 ची ट्रॉफी जिंकताच गौरव खन्नाची पहिली पोस्ट समोर, चाहत्यांचे आभार मानत म्हणाला...
Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna Victory Post: टेलिव्हिजनवरील सर्वात वादग्रस्त शो म्हणजे बिग बॉस. गेल्या काही दिवसांपासून 'बिग बॉस १९' आणि त्यातील स्पर्धकांची चांगलीच चर्चा होती. या शोमध्ये १८ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यापैकी टॉप ५ मध्ये पोहचलेल्या अमाल मलिक, गौरव खन्ना, प्रणित मोरे, फरहाना भट्ट आणि तान्या मित्तल या स्पर्धकांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली. अखेर या सगळ्यांना मागे टाकत टीव्हीचा सुपरस्टार गौरव खन्नाने या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. 'बिग बॉस १९' जिंकल्यानंतर गौरव खन्नाची पहिली पोस्ट समोर आली आहे.
गौरव खन्नाच्या टीमने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यात गौरव ट्रॉफीसोबत खास पोझ देताना दिसतोय. तसेच एका फोटोत पत्नी आकांक्षा चमोला आणि मृदुल तिवारीसोबतही दिसत आहे. या फोटोंसोबत गौरव खन्नाच्या टीमनं लिहलं, "तीन महिन्यांचा प्रवास अखेर संपला… आणि काय अप्रतिम शेवट झाला! ट्रॉफी अखेर आपल्या घरी आली. ते सगळे विचारत राहिले, "GK काय करणार?" आणि जसं आपण नेहमी म्हणायचो, GK आपल्या सर्वांसाठी ट्रॉफी घरी आणणार! आणि त्यानं ते करून दाखवलं".
गौरव खन्नाच्या टीमने चाहत्यांचे आभार मानत लिहलं, "हा प्रवास आमच्यासाठी अतिशय सुंदर आणि भावनिक अनुभवांनी भरलेला होता. गौरवसोबत आपण प्रत्येक दिवस जगलो. प्रत्येक यश, प्रत्येक अपयश, प्रत्येक सन्मानाचा क्षण आणि आजचा हा विजय... खरंच खूप वैयक्तिक वाटतोय. हा विजय प्रत्येक त्या व्यक्तीचा आहे, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, मत दिलं, त्याच्या पाठीशी उभे राहिले, ज्यांनी त्याचं स्वप्न स्वतःचं बनवलं. आज आपण केवळ ट्रॉफी जिंकल्याचा आनंद साजरा करत नाही आहोत, तर आपल्या एकतेचा आणि प्रेमाचा विजय साजरा करत आहोत. आपण हा विजय एकत्र जिंकलो आहोत. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद".