Bigg Boss 19: शॉकिंग! 'बिग बॉस'मधून 'या' स्पर्धकाची एक्झिट, चाहत्यांना बसणार मोठा धक्का
By कोमल खांबे | Updated: October 11, 2025 11:20 IST2025-10-11T11:19:40+5:302025-10-11T11:20:04+5:30
या आठवड्यात 'बिग बॉस १९'च्या घरातून कोण बाहेर पडणार याबाबत खुलासा झाला आहे. या आठवड्याच्या एलिमिनेशनमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे.

Bigg Boss 19: शॉकिंग! 'बिग बॉस'मधून 'या' स्पर्धकाची एक्झिट, चाहत्यांना बसणार मोठा धक्का
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' हे पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात घरात नॉमिनेशन झालं नाही. त्यामुळे कोणीही घरातून बाहेर गेलं नाही. मात्र या आठवड्यात 'बिग बॉस १९'च्या घरातील एका सदस्याचा प्रवास संपणार आहे. या आठवड्यात 'बिग बॉस १९'च्या घरातून कोण बाहेर पडणार याबाबत खुलासा झाला आहे. या आठवड्याच्या एलिमिनेशनमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे.
यंदाच्या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत प्रणित मोरे, मीनल गिरी, मृदुल तिवारी, बसीर अली, अश्नूर कौर आणि झिशान कादरी हे सदस्य नॉमिनेट झाले होते. या सदस्यांपैकी एकाला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. प्रणित मोरे, मीनल गिरी किंवा मृदुल तिवारी यांच्यापैकी कोणीतरी एक यंदाच्या आठवड्यात घराबाहेर जाईल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र यापैकी कुणीच घराबाहेर जाणार नाहीये.
'बिग बॉस १९'च्या घरात या आठवड्यात शॉकिंग एलिमिनेशनमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे. काही इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन या आठवड्यात झीशान कादरी घराबाहेर जाण्याचे अपडेट देण्यात आले आहेत. शुक्रवारी 'वीकेंड का वार'चं शूटिंग झालं. यामध्ये झीशान कादरी घराबाहेर आला आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे.