मालती चहरने तानियाची चांगलीच जिरवली! टास्कमध्ये स्विमिंगपूलमध्ये ढकललं, रडून रडून मित्तल मॅडम बेहाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:55 IST2025-10-07T18:54:47+5:302025-10-07T18:55:46+5:30
मालतीच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे तानिया मित्तल खूश नसल्याचं दिसत होतं. तानियाशी बोलताना मालतीने तिची पोलखोल केली. त्यामुळे ती नाराज होती. पण, आता मालतीने टास्कदरम्यान तानियाशी थेट पंगा घेतला आहे.

मालती चहरने तानियाची चांगलीच जिरवली! टास्कमध्ये स्विमिंगपूलमध्ये ढकललं, रडून रडून मित्तल मॅडम बेहाल
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या घरात क्रिकेटर दीपक चहरची बहीण मालती चहरने वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली. घरात येताच मालतीने गेम खेळायला सुरुवात केली आहे. मालतीच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीमुळे तानिया मित्तल खूश नसल्याचं दिसत होतं. तानियाशी बोलताना मालतीने तिची पोलखोल केली. त्यामुळे ती नाराज होती. पण, आता मालतीने टास्कदरम्यान तानियाशी थेट पंगा घेतला आहे.
बिग बॉसच्या घरात सदस्यांना नॉमिनेशन टास्क देण्यात आला आहे. या टास्कमध्ये दोन ग्रुप करण्यात आले आहेत. या आठवड्यात मालती चहर आणि फरहाना नॉमिनेट होणार नाहीत. त्यामुळे या टास्कमध्ये त्या डायन असणार आहेत. या टास्कमध्ये दोन ग्रुपमधील सदस्यांना त्यांना स्विमिंगपूलमध्ये ढकलून नॉमिनेट करायचं आहे. ज्या ग्रुपमधील सगळ्यात जास्त सदस्य बाद होतील तो ग्रुप नॉमिनेट होणार आहे. या टास्कचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
यामध्ये मालती चहर तानियाला स्विमिंगपूलमध्ये जोरात ढकलून देत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर तानिया रडत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. इतर सदस्य तानियाला धीर देत आहेत. तानियाला रडताना पाहून मालती तिला विचारते "रडत का आहेस?". त्यावर तानिया तिला म्हणते की "मी तुझ्यावर रागावलेले नाही". नंतर मालती तिला म्हणते की तुला जेवढं रडायचं तेवढं रड. मी तुला पुन्हा ढकलून देईन.
नंतर मालती घरातील इतर सदस्यांसोबत बोलताना दिसत आहे. ती म्हणते, "तानिया फक्त साडी नेसते असं नाही. तिला माहीत होतं की टास्क पाण्यात आहे. ती ओव्हर करतेय हे मला जाणवलं. ती साडी नेसूनच याच्यासाठी आली की ती अशीच वागेल. तिला नेहमी महत्त्व हवं असतं. म्हणून ती हे सगळं करत असते".