Bigg Boss 19: "तुला ऐकायचं असेल तर ऐक, नाहीतर मी..."; सलमान खानचा राग अनावर, अमाल मलिकवर बरसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 11:25 IST2025-11-22T11:07:11+5:302025-11-22T11:25:58+5:30

बिग बॉस १९ च्या नवीन एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे. यात सलमान खान अमाल मलिकवर चांगलाच रागावताना दिसतोय

Bigg Boss 19 Salman Khan anger on Amaal Malik and shahbaz video viral | Bigg Boss 19: "तुला ऐकायचं असेल तर ऐक, नाहीतर मी..."; सलमान खानचा राग अनावर, अमाल मलिकवर बरसला

Bigg Boss 19: "तुला ऐकायचं असेल तर ऐक, नाहीतर मी..."; सलमान खानचा राग अनावर, अमाल मलिकवर बरसला

बहुचर्चित 'बिग बॉस १९' (Bigg Boss 19) चा २२ नोव्हेंबरचा 'वीकेंड का वार' एपिसोड अत्यंत धमाकेदार ठरणार आहे. होस्ट आणि सुपरस्टार सलमान खानने घरातील दोन प्रमुख स्पर्धक संगीतकार अमाल मलिक आणि शहबाजला कठोर शब्दात सुनावलं. इतकंच नव्हे, सलमान बोलत असताना अमाल मध्येच बोलला. त्यामुळे भाईजानचा राग चांगलाच अनावर झाला. काय घडलं नेमकं? 

सलमान अमालवर बरसला

काही दिवसांपूर्वी अमाल आणि शहबाज यांनी 'बिग बॉस'च्या निर्मात्यांवर पक्षपातीपणा केल्याचा थेट आरोप केला होता. शहबाजने तर रागाच्या भरात, "ट्रॉफी गौरव खन्नालाच देऊन टाका," असं वक्तव्य केलं होतं. या सर्व प्रकारावर सलमान खानने तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रोमोमध्ये सलमान खान अमाल मलिकला म्हणाला, "अमाल, तुझं वर्तन अत्यंत वाईट होतं. तू घरातील मजबूत लोकांशी थेट टक्कर न घेता, त्यांच्या पाठीमागे त्यांना नावं ठेवतोस. गौरव, प्रणित किंवा फरहाना यांना तू कधीही समोरुन भिडला नाहीस." अमालने या गोष्टीला नकार देताना सलमानचं बोलणं मध्येच तोडलं. त्यामुळे सलमान त्याच्यावर भडकला. 'ऐकायचं असेल तर ऐक, नाहीतर मी शांत बसतो' असं सलमानने कठोर शब्दात अमालला सुनावलं.


त्यानंतर सलमान खानने शहबाजची शाळा घेतली. त्याने शहबाजला स्पष्टपणे 'अमालचा चमचा' असं म्हटलं. सलमान म्हणाला, "शहबाज, तू अमालबद्दल किती पझेसिव्ह झाला आहेस, याची तुला अजून जाणीव नाही. घरात आल्यापासून तू फक्त 'चमचा' बनून राहिला आहेस."

सलमानने दिली थेट घराबाहेर काढण्याची धमकी

शेवटी मोठा इशारा देताना सलमान खान म्हणाला, "तुम्ही दोघांनी जो गोंधळ घातला की 'बिग बॉस अनफेअर आहे'... जर मी मागच्या आठवड्यात इथे होस्ट म्हणून असतो, तर मी मुख्य द्वार उघडले असते आणि तुम्हाला कोणताही पर्याय न देता बाहेर काढले असते." सलमानच्या या तडकाफडकी वक्तव्यामुळे अमाल आणि शहबाज या दोघांचेही चेहरे पडले होते.

Web Title : बिग बॉस 19: सलमान खान ने अमाल मलिक को लगाई फटकार।

Web Summary : सलमान खान ने अमाल मलिक और शहबाज को बिग बॉस में पक्षपात का आरोप लगाने पर फटकार लगाई। उन्होंने अमाल की पीठ पीछे वार करने के लिए आलोचना की और उनके व्यवहार के बारे में चेतावनी दी, और कहा कि अगर वह पहले मौजूद होते तो उन्हें तुरंत बाहर कर देते।

Web Title : Bigg Boss 19: Salman Khan lashes out at Amaal Malik.

Web Summary : Salman Khan reprimanded Amaal Malik and Shehbaz for alleging bias in Bigg Boss. He criticized Amaal for backstabbing and warned them about their behavior, threatening immediate eviction if he had been present earlier for their misconduct.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.