प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:52 IST2025-12-04T11:50:35+5:302025-12-04T11:52:26+5:30
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनाले आधीच एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामुळे प्रणितच 'बिग बॉस १९'चा विजेता असल्याचं बोललं जात आहे.

प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' चा ग्रँड फिनाले येत्या रविवारी म्हणजेच ७ डिसेंबरला पार पडणार आहे. मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरेने टॉप ५मध्ये त्याचं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे प्रणितने 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी जिंकावी अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. पण, 'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनाले आधीच एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामुळे प्रणितच 'बिग बॉस १९'चा विजेता असल्याचं बोललं जात आहे.
सोशल मीडियावर प्रणितचा एक फोटो व्हायरल झाला आहे. 'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये प्रणितच्या हातात 'बिग बॉस'ची ट्रॉफी दिसत आहे. हा फोटो पाहून प्रणितच 'बिग बॉस १९'चा विजेता झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. एका सोशल मीडिया अकाऊंटवरुन प्रणितचा हा फोटो शेअर करण्यात आला आहे. मात्र, हा 'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेचा फोटो नाही. हा एडिट केलेला फोटो आहे.

'बिग बॉस १८'च्या ग्रँड फिनालेचा हा फोटो आहे. गेल्या सीझनमध्ये करणवीर मेहरा 'बिग बॉस १८'चा विजेता ठरला होता. करणवीरच्या जागी प्रणितचा फोटो एडिट करण्यात आला आहे. शिवाय प्रणितच्या हातात दिसणारी ट्रॉफीदेखील 'बिग बॉस १८' सीझनची आहे. ही पोस्ट प्रणितला जास्तीत जास्त व्होट करण्यासाठी करण्यात आली आहे. "आपला प्रणितभाऊ ट्रॉफी घेऊन आलाच पाहिजे, ट्रॉफी महाराष्ट्रातच आली पाहिजे, महाराष्ट्राची शान...आपला प्रणित भाऊ मोरे", असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये प्रणित मोरेसह गौरव खन्ना, अमाल मलिक, तान्या मित्तल आणि फरहाना भट पोहोचले आहेत. आता यापैकी कोण ट्रॉफीवर नाव कोरणार हे येत्या रविवारी कळेल. पण, प्रणितला चाहत्यांचा फूल सपोर्ट मिळत असल्याचं दिसत आहे.