प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
By कोमल खांबे | Updated: October 28, 2025 16:32 IST2025-10-28T16:28:41+5:302025-10-28T16:32:24+5:30
बिग बॉसच्या घरात सुरुवातीला प्रणित मोरे आणि फरहानामध्ये चांगली मैत्री होत असल्याचं दिसत होतं. मात्र नंतर त्यांच्यात वाद होऊ लागले होते. आता प्रणितची मालती चहरशी गट्टी जमत असल्याचं दिसत आहे.

प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरातील समीकरणं दिवसेंदिवस बदलताना दिसत आहे. गेल्याच आठवड्यात नेहाल-फरहाना आणि तान्या-मिनल यांच्या फ्रेंडशिपची समीकरणं बदललेली पाहायला मिळाली. बिग बॉसच्या घरात सुरुवातीला प्रणित मोरे आणि फरहानामध्ये चांगली मैत्री होत असल्याचं दिसत होतं. मात्र नंतर त्यांच्यात वाद होऊ लागले होते. आता प्रणितची मालती चहरशी गट्टी जमत असल्याचं दिसत आहे.
प्रणित मोरे आणि दीपक चहरची बहीण मालती चहरचा बिग बॉसच्या घरातील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत मालती आणि प्रणित मोरेमधलं बॉण्डिंग दिसत आहे. व्हिडीओत सुरुवातीला मालती, प्रणित आणि गौरव दिसत आहेत. प्रणित मालतीची मस्करी करत असल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यानंतर मालतीलाही प्रणितची फ्रेंडशिप आवडत आहे. प्रणित मोरे आणि मालतीची फ्रेंडशिप पाहून घरातल्या सदस्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. फरहाना आणि तान्या वॉशरुममध्ये प्रणितला चिडवताना दिसत आहेत.
पुढे व्हिडीओत दिसतंय की प्रणित त्याच्यासाठी आणि मालतीसाठी ऑम्लेट बनवून घेऊन जाताना दिसत आहे. ते पाहून लिव्हिंग एरियात बसलेला गौरव आणि मृदुल प्रणितला चिडवतात. घरात अजून एक हॅशटॅग बनत असल्याचं गौरव म्हणताना दिसत आहे. गार्डन एरियामध्ये मालती आणि प्रणित बसून ऑम्लेट खात असल्याचं दिसत आहे. तर मालती प्रणितने तिच्यासाठी बनवलेल्या ऑम्लेटचं कौतुकही करते. आता प्रणित आणि मालतीच्या मैत्रीमुळे खेळातील काही समीकरणं बदलतील का? हे पाहावं लागेल.