Bigg Boss 19: प्रणित मोरे-गौरव खन्नाच्या मैत्रीत फूट? 'टिकट टू फिनाले'नंतर जोरदार भांडण, अंकिता वालावलकरची कमेंट, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 15:25 IST2025-11-27T15:25:06+5:302025-11-27T15:25:35+5:30
प्रणित मोरे, गौरव खन्ना आणि अश्नूर कौरमध्ये भांडणं होताना दिसत आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.

Bigg Boss 19: प्रणित मोरे-गौरव खन्नाच्या मैत्रीत फूट? 'टिकट टू फिनाले'नंतर जोरदार भांडण, अंकिता वालावलकरची कमेंट, म्हणाली...
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'चं हे पर्व आता अंतिम टप्प्यात आलं आहे. लवकरच बिग बॉसचा ग्रँड फिनाले पार पडणार असून टिकट टू फिनालेसाठी घरातील सदस्यांमध्ये टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये बाजी मारत टिकट टू फिनाले कोण नावावर करणार, हे येत्या काही दिवसांतच समजेल. पण, यावरुनच प्रणित मोरे, गौरव खन्ना आणि अश्नूर कौरमध्ये भांडणं होताना दिसत आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.
बिग बॉसच्या घरातील शेवटचे काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे घरातील समीकरणंही आता बदलताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दिसतंय की अश्नूर गौरवला म्हणते, "टास्कमध्ये लोकांचे खरे चेहरे दिसतात". त्यानंतर गौरव तिला उत्तर देत म्हणतो, "तू खरंच एवढी भोळी आहेस का?". यावरुन नंतर प्रणित आणि गौरवमध्ये भांडण झाल्याचं दिसतं. प्रणित गौरवला विचारतो, "तू मला एक सांग... तू सेफ खेळलास की नाही?". त्यावर गौरव म्हणतो, "जर मी सेफ खेळतोय तर तो माझा प्रश्न आहे". "मग हेच तू अॅक्सेप्ट कर. तू या लोकांना एवढा का घाबरतोस?", असं प्रणित गौरवला म्हणतो. मग गौरव चिडतो आणि अश्नूर-प्रणितला म्हणतो, "त्या लोकांनी तुम्हाला पाडलं म्हणून तुम्ही मला बोलत आहात. हे सगळं करण्याचा तुला काहीच अधिकार नाही". प्रणित म्हणतो, "आता तू सास बहु सिरियलसारखं करतोस. तू मला असं बोललास तर मी तुला असं बोलेन". "तुम्ही दोघं माझ्याविरोधात टीम बनवून खेळताय का?", असं पुढे गौरव म्हणतो.
या व्हिडीओवरुन गौरव आणि प्रणितच्या मैत्रीच फूट पडून त्यांचा ग्रुप तुटणार का? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. या प्रोमो व्हिडीओवर अंकिता वालावलकरनेही कमेंट केली आहे. "मला माझा सीझन आठवला. अशीच परिस्थिती आमच्यावेळी देखील निर्माण झाली होती", असं म्हणत अंकिताने हसण्याचे स्माइली कमेंट केले आहेत.