Bigg Boss 19: हे असतील 'बिग बॉस'चे टॉप २; बाहेर पडलेल्या स्पर्धकाचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:21 IST2025-10-29T17:21:02+5:302025-10-29T17:21:30+5:30
नेहाल चुडासमा आणि बसीर अलीचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. घरातून बाहेर पडल्यावर नेहालने बिग बॉस १९च्या फायनलिस्टबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Bigg Boss 19: हे असतील 'बिग बॉस'चे टॉप २; बाहेर पडलेल्या स्पर्धकाचा मोठा खुलासा
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' सुरू होऊन आता दोन महिने झाले आहेत. हा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. गेल्या आठवड्यात घरातून दोन स्पर्धकांनी एक्झिट घेतली. नेहाल चुडासमा आणि बसीर अलीचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपला. घरातून बाहेर पडल्यावर नेहालने बिग बॉस १९च्या फायनलिस्टबद्दल मोठा खुलासा केला आहे.
नेहालला "तुझ्याऐवजी घरातून कोण बाहेर पडायला हवं होतं?" असं विचारलं. ती म्हणाली, "नीलम, अश्नूर, मृदुल, मालती". त्यानंतर टॉप ३ कोण असतील असं विचारल्यावर नेहालने दोन स्पर्धकांची नावं घेतली. "गौरव आणि फरहाना...हे टॉप २ असतील", असं नेहाल म्हणाली. घरातून बाहेर पडल्यावर कोणाला भेटशील? असा प्रश्नही नेहालला विचारला गेला. तिने "तान्यामित्तल सोडून मी सगळ्यांसोबत फ्रेंडशिप ठेवेन". घरातील मास्टरमाइंड कोण? असं विचारताच नेहालने गौरवचं नाव घेतलं.
दरम्यान, नेहालला सुरुवातीच्या काही दिवसांत सिक्रेट रुममध्ये ठेवण्यात आलं होतं. तेव्हा नेहालने घरातील सदस्यांचा गेम पाहिला होता. पहिल्या दिवसापासून नेहाल बिग बॉसच्या घरात तिची जागा बनवत होती. तिचा खेळही प्रेक्षकांना आवडत होता. मात्र गेल्या आठवड्यात तिला घराचा निरोप घ्यावा लागला.