VIDEO: 'बिग बॉस १९'च्या घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये राडा; मृदुल तिवारी जखमी, कोण होणार घराबाहेर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 14:27 IST2025-09-04T14:22:18+5:302025-09-04T14:27:28+5:30
'बिग बॉस'च्या या आठवड्याच्या कॅप्टनसी टास्कचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे

VIDEO: 'बिग बॉस १९'च्या घरात कॅप्टन्सी टास्कमध्ये राडा; मृदुल तिवारी जखमी, कोण होणार घराबाहेर?
Bigg Boss 19: सध्या 'बिग बॉस'चा १९ वा सीझन प्रचंड गाजतोय आणि त्याची चर्चासुद्धा जोरदार रंगतेय. सलमान खान होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस १९' च्या घरात आता खऱ्या अर्थाने स्पर्धेला सुरुवात झाली आहे. दर दिवशी भांडण,वाद -विवाद आणि त्याचबरोबर नवीन टास्क 'बिग बॉस'च्या घरात पाहायला मिळत आहे. नुकतंच कॅप्टनसी टास्क दरम्यान स्पर्धकांमध्ये मोठी हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. या टास्कमध्ये स्पर्धक मृदुल तिवारीला गंभीर दुखापत झाल्याचेही पाहायला मिळाले.
'बिग बॉस'च्या या आठवड्याच्या कॅप्टनसी टास्कचा एक प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये स्पर्धकांमध्ये जोरदार धक्काबुक्की होत आहे. स्पर्धकांना एका मशीनकडे धाव घ्यावी लागत आहे. या दरम्यान, अभिषेक बजाज आणि बसीर अली यांच्यात जोरदार वाद झाल्याचे दिसत आहे. यात मृदुल तिवारीच्या चेहऱ्याला दुखापत झाली असून तिच्या तोंडातून रक्त येत असल्याचे प्रोमोमध्ये दिसत आहे.
मृदुलला दुखापत झाल्यामुळे घरातील इतर सदस्य अभिषेक बजाजवर चांगलेच संतापले. अभिषेकही स्वतःचा बचाव करताना दिसला. 'बिग बॉस'च्या घरात शारीरिक हिंसाचाराला परवानगी नाही. त्यामुळे आता मृदुलला दुखापत झाल्याबद्दल अभिषेकला काय शिक्षा होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
'बिग बॉस १९'मधून कोण बाहेर पडणार?
या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी पाच स्पर्धक नॉमिनेटेड आहेत. तान्या मित्तल, मृदुल तिवारी, अवेज दरबार, कुनिका सदानंद, अमल मलिक यापैकी एका स्पर्धकाचा 'बिग बॉस'चा प्रवास या आठवड्यात संपणार आहे. आगामी एपिसोडमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.