Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 10:48 IST2025-10-29T10:47:10+5:302025-10-29T10:48:04+5:30
प्रणितने 'बिग बॉस'च्या घरात चांगलाच जम बसवला आहे. एवढंच नव्हे तर आता प्रणित 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन बनला आहे.

Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात प्रणित मोरेने एन्ट्री घेतल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. सुरुवातीला प्रणितला खेळ समजून घेण्यास आणि बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी वेळ लागला. तो फारसा कुठे दिसायचाही नाही. पण, आता मात्र प्रणितने 'बिग बॉस'च्या घरात चांगलाच जम बसवला आहे. एवढंच नव्हे तर आता प्रणित 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन बनला आहे.
'बिग बॉस'च्या घरात या आठवड्यातील कॅप्टन्सी टास्क खेळवला जाणार आहे. या टास्कमध्ये बिग बॉसने जोड्यांमध्ये हे कार्य दिलं आहे. कुनिका-नीलम, तान्या-मृदुल, प्रणित-शहबाज, गौरव-मालती आणि अमाल-फरहाना अशा जोड्या बिग बॉसने बनवल्या होत्या. अभिषेक आणि अश्नूरने नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांना या आठवड्यातील कॅप्टन्सी कार्यातून बाद करण्यात आलं होतं. या जोड्यांना घरातील काही वस्तू आणायला सांगितल्या होत्या. जी जोडी सगळ्यात जास्त वस्तू गोळा करेल त्या जोडीचे स्पर्धक कॅप्टन्सीचे दावेदार असतील, असा टास्क होता. पण, यामध्ये टाय झाल्याने नंतर घरातील सदस्यांचं व्होटिंग घेऊन प्रणित आणि शहबाज या जोडीला कॅप्टन्सी टास्कसाठी पात्र ठरवलं जातं.
🚨 Pranit More becomes the new captain of the Bigg Boss 19 house.
— BBTak (@BiggBoss_Tak) October 28, 2025
Complete dominance in the captaincy task, thanks to Gaurav, Ashnoor, Abhishek & Malti helping him in each round.
The task was for HMs to grab the maximum balls and give them to the contenders to stick.
नंतर प्रणित आणि शहबाजमध्ये कॅप्टन्सीसाठी आणखी एक टास्क खेळवला जातो. या टास्कमध्ये अश्नूर, अभिषेक, मालती आणि गौरव यांच्या मदतीने प्रणित बाजी मारतो आणि घराचा कॅप्टन होतो. मराठमोळा प्रणित बिग बॉसच्या घरातील कॅप्टन झाल्याने आता चाहत्यांना बिग बॉसच्या खेळ बघण्यात आणखी मजा येणार आहे.