"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
By कोमल खांबे | Updated: October 20, 2025 12:51 IST2025-10-20T12:51:02+5:302025-10-20T12:51:43+5:30
बिग बॉसच्या घरात साडी नेसून फिरणाऱ्या आणि स्वत:ला संस्कारी दाखवणाऱ्या तान्या मित्तलचे काही व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तान्या खोटं वागत असल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. आता बिग बॉसच्या घरात मालतीने तान्याची पोलखोल केली आहे.

"मोठी सती सावित्री बनून फिरतेय, रीलमध्ये फक्त पेटीकोटवर...", तान्या मित्तलची मालतीकडून पोलखोल
Bigg Boss 19: मालती चहरने बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतल्यापासून तान्या मित्तलचा पिच्छा काही सोडलेला नाही. पहिल्या दिवसापासून ती तान्याशी पंगा घेताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात साडी नेसून फिरणाऱ्या आणि स्वत:ला संस्कारी दाखवणाऱ्या तान्या मित्तलचे काही व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे तान्या खोटं वागत असल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. आता बिग बॉसच्या घरात मालतीने तान्याची पोलखोल केली आहे.
बिग बॉसच्या घरातून एक नवा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मालती चहरसोबत घरातील काही सदस्य बसल्याचे दिसत आहे. मालती विचारते, "तान्या खूप सती सावित्री बनून फिरतेय ना...घरातील लोक तिच्याबद्दल काय विचार करतात?". त्यावर अभिषेक बजाज म्हणतो, "ती साडी नेसते...संस्कारी वाटते". त्यानंतर मालती तान्याची पोलखोल करते. अभिषेकला ती म्हणते, "तुला फक्त एक बाजू माहित आहे. तिची दुसरी बाजू माहित नाही. ती जशी दाखवते तशी ती नाहीये. तिचे मिनी स्कर्टमध्ये सुद्धा व्हिडीओज आहेत. तिचे असेही रिल्सही आहेत ज्यामध्ये ती साडी नेसताना स्वत:ला दाखवते. फक्त पेटीकोट घातला आहे. म्हणून ती मीम मटेरियल आहे. कारण ती आहे एक आणि दाखवते एक...ती गेमर आहे".
मालतीचं म्हणणं ऐकल्यानंतर घरातील सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याचं दिसत आहे. मालतीने तान्याची पोलखोल केल्यानंतर घरातील समीकरणं पुन्हा बदलणार असल्याचं दिसत आहे. आता यावरुन घरात नवीन हंगामा होईल का, हे पाहावं लागेल.