अडल्ट Toys विकायची तान्या मित्तल; मालती चहरकडून मोठा खुलासा, म्हणाली- "तिचे अनेक बिजनेस..."
By कोमल खांबे | Updated: October 21, 2025 12:56 IST2025-10-21T12:54:59+5:302025-10-21T12:56:03+5:30
बिग बॉसच्या घरात साडी नेसून फिरणाऱ्या आणि स्वत:ला संस्कारी दाखवणाऱ्या तान्या मित्तलचे काही व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या व्हिडीओजबाबत घरातील सदस्यांना सांगून मालतीने तान्याची पोलखोल केली. त्याबरोबरच एक धक्कादायक विधानही मालतीने तान्याच्या बाबतीत केलं आहे.

अडल्ट Toys विकायची तान्या मित्तल; मालती चहरकडून मोठा खुलासा, म्हणाली- "तिचे अनेक बिजनेस..."
Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतल्यापासून मालती चहर तान्या मित्तलच्या पाठीमागे पडली आहे. पहिल्या दिवसापासून ती तान्याशी पंगा घेताना दिसत आहे. बिग बॉसच्या घरात साडी नेसून फिरणाऱ्या आणि स्वत:ला संस्कारी दाखवणाऱ्या तान्या मित्तलचे काही व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या व्हिडीओजबाबत घरातील सदस्यांना सांगून मालतीने तान्याची पोलखोल केली. त्याबरोबरच एक धक्कादायक विधानही मालतीने तान्याच्या बाबतीत केलं आहे.
मालती म्हणाली, "मी असं ऐकलंय की तान्याचे अनेक बिजनेस बंद झाले आहेत. तिचा एक असा बिजनेस होता ज्याबद्दल मी तुम्हाला सांगूही शकत नाही. मी त्याबद्दल ऐकलं आहे". त्यानंतर घरातील सदस्यांनी विचारल्यानंतर मालतीने सांगितलं की तान्या अडल्ट टॉइज विकायची. हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला.
त्यानंतर नेहाल आणि गौरवने तान्याला तिच्या या बिजनेसबाबत विचारलं. तेव्हा तान्याने सांगितलं की तिचा असा कोणताच बिजनेस नव्हता. मालतीने तान्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर घरात वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरात आता पुन्हा मालती विरुद्ध तान्या असं चित्र दिसू शकतं.