Bigg Boss 19: 'बिग बॉस'मध्ये येणार कुनिकाचा Ex बॉयफ्रेंड? कुमार सानू यांच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 14:09 IST2025-11-07T14:08:58+5:302025-11-07T14:09:32+5:30
घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणारा सदस्य हा अभिनेत्री कुनिका सदानंदचा एक्स बॉयफ्रेंड असल्याचं बोललं जात आहे. बिग बॉसच्या टीमकडून सिंगर कुमार सानू यांना शोची ऑफर मिळाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Bigg Boss 19: 'बिग बॉस'मध्ये येणार कुनिकाचा Ex बॉयफ्रेंड? कुमार सानू यांच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीची चर्चा
Bigg Boss 19: बिग बॉस १९मध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा आहे. विशेष म्हणजे घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणारा सदस्य हा अभिनेत्री कुनिका सदानंदचा एक्स बॉयफ्रेंड असल्याचं बोललं जात आहे. बिग बॉसच्या टीमकडून सिंगर कुमार सानू यांना शोची ऑफर मिळाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
कुमार सानू यांना बिग बॉसच्या टीमने शोमध्ये येण्यासाठी ऑफर दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार कुमार सानू बिग बॉसच्या घरात जरी वाइल्ड कार्ट एन्ट्री घेणार असले तरी ते केवळ एका आठवड्यासाठीच शोमध्ये असतील. कुमार सानू हे स्पेशल गेस्ट म्हणून बिग बॉसमध्ये येण्याची शक्यता आहे. पण, याबाबत अद्याप बिग बॉसच्या टीमकडून कोणतीही ऑफिशियल माहिती मिळालेली नाही. पण, खरंच कुमार सानू यांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली तर मग शोला आणि खेळालाही वेगळं वळण मिळेल.
कुनिका सदानंद आणि कुमार सानू हे काही वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यांच्या अफेअरच्या प्रचंड चर्चाही रंगल्या होत्या. कुमार सानू हे विवाहित असूनही त्यांचं कुनिकासोबत अफेअर सुरू होतं. अभिनेत्रीही याबद्दल अनेकदा उघडपणे भाष्य केलं आहे. पण, त्यानंतर काही कारणांनी ते वेगळे झाले. आता जर घरात कुमार सानू यांची एन्ट्री झाली तर कुनिका आणि त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण होऊ शकेल का, हे पाहावं लागेल.