भावा जिंकलस! 'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये पोहोचला प्रणित मोरे, 'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 11:40 IST2025-12-01T11:40:16+5:302025-12-01T11:40:51+5:30
'बिग बॉस १९'चा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये यंदाच्या सीझनच्या टॉप ५ सदस्यांची झलक दिसत आहे.

भावा जिंकलस! 'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये पोहोचला प्रणित मोरे, 'या' दिवशी पार पडणार ग्रँड फिनाले
Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९' हा सीझन आता अंतिम टप्प्यात आला आहे. या सीझनचा शेवटचा आठवडा सुरू असून आता घरात फक्त ६ सदस्य राहिले आहेत. यापैकी टॉप ५ सदस्य कोण असणार? आणि कोणाला घरातून एक्झिट घ्यावी लागणार, याबाबत चाहतेही उत्सुक आहेत. मात्र त्या एका सदस्याच्या एलिमिनेशन आधीच 'बिग बॉस १९'चे टॉप ५ कोण, हे समजलं आहे. 'बिग बॉस १९'चा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये यंदाच्या सीझनच्या टॉप ५ सदस्यांची झलक दिसत आहे.
'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. याबाबत एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमधून टॉप ५ सदस्यांचा उलगडा झाला आहे. विशेष म्हणजे मराठमोळा कॉमेडियन असलेल्या प्रणित मोरेने 'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये स्थान मिळवलं आहे. या प्रोमोमध्ये प्रणित, अमाल मलिक, गौरव खन्ना, फरहाना भट आणि तान्या मित्तल हे सदस्य दिसत आहेत. तर ग्रँड फिनालेच्या प्रोमोमध्ये मालती कुठेच दिसत नाहीये. त्यामुळे मालती टॉप ५ मध्ये नसल्याचा अंदाज चाहत्यांनी व्यक्त केला आहे.
'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले येत्या रविवारी म्हणजेच ७ डिसेंबरला होणार आहे. या आठवड्यात घरात प्रेस कॉन्फरन्स होणार आहे. 'बिग बॉस १९'च्या घरातील सदस्यांना पत्रकारांच्या रोखठोक प्रश्नांना उत्तरं द्यावी लागणार आहेत. तर या आठवड्यात मिड वीक एविक्शन होऊ शकतं. ज्यामध्ये घरातील एका सदस्याला घराचा निरोप घ्यावा लागणार आहे. टिकट टू फिनाले जिंकत गौरव खन्ना फिनालेमध्ये पोहोचला आहे. आता 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीचा दावेदार कोण, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.