Bigg Boss 19: "तो जिंकला नाही, पण...", प्रणित मोरेच्या आईची मनं जिंकणारी प्रतिक्रिया
By कोमल खांबे | Updated: December 8, 2025 13:06 IST2025-12-08T13:06:04+5:302025-12-08T13:06:38+5:30
प्रणितदेखील 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीचा दावेदार मानला जात होता. मात्र, त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर त्याच्या आईवडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Bigg Boss 19: "तो जिंकला नाही, पण...", प्रणित मोरेच्या आईची मनं जिंकणारी प्रतिक्रिया
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. टीव्हीचा सुपरस्टार गौरव खन्नाने 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी त्याच्या नावावर केली. मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरेने 'बिग बॉस १९'च्या टॉप ५मध्ये जागा बनवली होती. प्रणितदेखील 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीचा दावेदार मानला जात होता. मात्र, त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर त्याच्या आईवडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनाले नंतर प्रणित मोरेच्या आईवडिलांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रणितची आई म्हणाली, "आम्ही खूप खूश आहोत. आता लोक आम्हाला त्याच्या नावाने ओळखतात. मला प्रणितची आई म्हणतात. त्यामुळे मला खूप छान वाटतं. प्रणितला टीव्हीवर रडताना पाहून मलाही रडू यायचं. प्रणित जिंकला नाही याचं दु:ख नाही. गौरव खन्ना जिंकला याचाही आम्हाला आनंद आहे. प्रणित तिसऱ्या नंबरवर आला तरीदेखील तो आमच्यासाठी विनरच आहे. त्याला लोकांचं खूप प्रेम मिळत आहे. त्यामुळे तो आमच्यासाठी विनरच आहे. प्रणितच्या चाहत्यांनी त्याला इथपर्यंत पोहोचवलं आहे. त्यामुळे त्यांचे आभार".
प्रणितच्या वडिलांनीही प्रतिक्रिया दिली. "खूप छान वाटतंय. शूटिंग सुरू असल्यामुळे प्रणितसोबत जास्त बोलता आलं नाही. प्रणित इथपर्यंत आला हिच खूप मोठी गोष्ट आहे. तो एका सामान्य घरातील मुलगा आहे. त्यामुळे तो जिंकला नाही याचं दु:ख नाही. हार जीत होतच असते. आम्हाला वाटलेलं तो मराठी बिग बॉसमध्ये येईल. पण त्याला हिंदीची ऑफर आली. सलमान खान यांच्यासोबत त्याने काम केलं हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे".