"प्रणित मोरेला अॅटिट्यूड आलाय", गौरव खन्नाच्या वक्तव्यानंतर कॉमेडियन भडकला, म्हणाला- "टीव्हीचा सुपरस्टार..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 15:10 IST2025-11-10T15:09:48+5:302025-11-10T15:10:18+5:30
बिग बॉसने प्रणित मोरेला विशेष अधिकार देत अभिषेक आणि अश्नूर कौर यांच्यापैकी एकाला वाचवण्यास सांगितलं होतं. प्रणितने अश्नूरचं नाव घेतल्याने अभिषेकला घराबाहेर जावं लागलं. त्यानंतर गौरव प्रणितला त्याने चुकीचा निर्णय घेतल्याचं म्हणत सुनावतो.

"प्रणित मोरेला अॅटिट्यूड आलाय", गौरव खन्नाच्या वक्तव्यानंतर कॉमेडियन भडकला, म्हणाला- "टीव्हीचा सुपरस्टार..."
Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९'मध्ये यंदाच्या वीकेंडला डबल एलिमिनेशन झालं. अभिषेक बजाज आणि नीलम गिरी हे दोन सदस्य घराबाहेर पडले. अभिषेक बजाजच्या एलिमिनेशनमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बिग बॉसने प्रणित मोरेला विशेष अधिकार देत अभिषेक आणि अश्नूर कौर यांच्यापैकी एकाला वाचवण्यास सांगितलं होतं. प्रणितने अश्नूरचं नाव घेतल्याने अभिषेकला घराबाहेर जावं लागलं. त्यानंतर गौरव प्रणितला त्याने चुकीचा निर्णय घेतल्याचं म्हणत सुनावतो.
आता बिग बॉसच्या घरातील नवीन व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रणित, गौरव खन्ना आणि मृदुल तिवारी वॉशरुममध्ये बसल्याचं दिसत आहे. प्रणित कपड्यांना इस्त्री करत आहे. तर मृदुल आणि गौरव बसल्याचं दिसत आहे. गौरव प्रणितकडे बघून मृदुलला म्हणतो, "भाई अॅटिट्युड एकाच व्यक्तीमध्ये आलाय...तो म्हणतोय की तुम्ही अंघोळ करून या. मी तोपर्यंत इस्त्री करेन. तुम्ही तुमचं बघा. मला काहीच फरक पडत नाही. त्याने सिरियसली घेतलं की जमीन याची आहे".
गौरवचं बोलणं ऐकून प्रणित त्याला उत्तर देतो. तो म्हणतो, "मी टीव्हीचा सगळ्यात मोठा सुपरस्टार आहे, हे कोण बोललं होतं. आणि म्हणतोय अॅटिट्यूड मला आलाय". त्यानंतर गौरव प्रणितला विचारतो की "अरे मी काय बोललोय?". मग प्रणित म्हणतो, "मी आहे सुपरस्टार... मी आता तुम्हाला हा शो जिंकून दाखवतो. मी २० वर्षांपासून इथे आहे. तुम्ही नाही बघितलं तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. हे कोण बोललं होतं?". त्यानंतर गौरव मृदुलला म्हणतो, "याचा अॅटिट्युड बघितला का?". मग प्रणित म्हणतो, "हा मला घरी पाठवा...मी पण बघतो".