प्रणित भावा जिंकलंस! कॉमेडियनच्या एक्झिटनंतर रडताना दिसला गौरव खन्ना, घरातील व्हिडीओ व्हायरल
By कोमल खांबे | Updated: November 4, 2025 15:52 IST2025-11-04T15:51:34+5:302025-11-04T15:52:18+5:30
प्रणित मोरेची बिग बॉसच्या घरात अश्नूर कौर, अभिषेक बजाज, मृदुल तिवारी, गौरव खन्ना, मालती चहर यांच्यासोबत चांगली फ्रेंडशिप झाली होती. प्रणितने एक्झिट घेतल्यानंतर मालतीचा चेहरा पडल्याचं दिसून आलं.

प्रणित भावा जिंकलंस! कॉमेडियनच्या एक्झिटनंतर रडताना दिसला गौरव खन्ना, घरातील व्हिडीओ व्हायरल
Bigg Boss 19: गेल्या आठवड्यात प्रणितने बिग बॉसमधून एक्झिट घेतली. प्रकृतीच्या कारणास्तव प्रणित मोरेला बिग बॉसच्या घराला निरोप घ्यावा लागला. मीडिया रिपोर्टनुसार प्रणितला डेंग्यू झाल्यामुळे उपचारासाठी त्याला 'बिग बॉस'चं घर सोडावं लागलं. प्रणित मोरेच्या एक्झिटमुळे चाहत्यांसोबतच घरातील सदस्यांनाही मोठा धक्का बसला. त्यामुळेच तो गेल्यानंतर त्याच्या ग्रुपमधील सदस्य नाराज झालेले पाहायला मिळाले.
प्रणित मोरेची बिग बॉसच्या घरात अश्नूर कौर, अभिषेक बजाज, मृदुल तिवारी, गौरव खन्ना, मालती चहर यांच्यासोबत चांगली फ्रेंडशिप झाली होती. प्रणितने एक्झिट घेतल्यानंतर मालतीचा चेहरा पडल्याचं दिसून आलं. आता घरातील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अश्नूर, अभिषेक, मृदुल आणि गौरव लिव्हिंग एरियामध्ये बसल्याचं दिसत आहे. अभिषेक म्हणतो, "अशाप्रकारे घरातून जाईल असं वाटलं नव्हतं". त्यानंतर गौरव भावुक होत असल्याचं दिसत आहे. "माझे या घरात दोनच मित्र होते. एक मृदुल आणि दुसरा प्रणित", असं म्हणत गौरव त्याचे डोळे पुसत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. प्रणितच्या एक्झिटने त्याला अश्रू अनावर झाले आहेत.
प्रणितने एक्झिट घेतल्याने या आठवड्यात कोणतंही एलिमिनेशन झालेलं नाही. आता चाहत्यांना प्रणितला परत बिग बॉसच्या घरात पाहायचं आहे. मात्र ते शक्य होईल की नाही, हे येणाऱ्या काहीच दिवसांत कळेल. या आठवड्यातच प्रणित घराचा कॅप्टन झाला होता. आणि त्यानंतर लगेचच त्याला बिग बॉसमधून एक्झिट घ्यावी लागली आहे. त्यामुळे चाहतेही नाराज आहेत.