Bigg Boss 19: "आम्ही बिग बॉसच पाहणार नाही...", प्रणित मोरेच्या एक्झिटमुळे चाहते नाराज
By कोमल खांबे | Updated: November 1, 2025 17:02 IST2025-11-01T17:02:25+5:302025-11-01T17:02:52+5:30
यंदाच्या आठवड्यात मराठमोळा प्रणित मोरे घराचा कॅप्टन झाला. मात्र त्यानंतर लगेचच त्याला बिग बॉसचं घर सोडावं लागल्याचं वृत्त आहे. या आठवड्यात प्रणित बेघर होणार आहे. प्रणित मोरेच्या एलिमिनेशनबाबत चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजीचे सूर उमटवले आहेत.

Bigg Boss 19: "आम्ही बिग बॉसच पाहणार नाही...", प्रणित मोरेच्या एक्झिटमुळे चाहते नाराज
Bigg Boss 19: बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. यंदाच्या आठवड्यात मराठमोळा प्रणित मोरे घराचा कॅप्टन झाला. मात्र त्यानंतर लगेचच त्याला बिग बॉसचं घर सोडावं लागल्याचं वृत्त आहे. या आठवड्यात प्रणित बेघर होणार आहे. त्याच्या एलिमिनेशनमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे चाहते नाराज आहे. प्रणित मोरेच्या एलिमिनेशनबाबत चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजीचे सूर उमटवले आहेत.
प्रणित मोरे बिग बॉसच्या घरातील कॅप्टन झाल्यानंतर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. प्रणितच्या सोशल मीडियावरुनही त्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. पण, प्रणित मोरे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार असल्याचं समजताच चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत नाराजी व्यक्त केली आहे. "नो प्रणित नो बिग बॉस", "प्रणितसाठी बिग बॉस बघत आहोत. जर प्रणित बाहेर गेला तर बिग बॉस बघणार नाही", "बिग बॉस बॉयकॉट करा" अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. तर प्रणितला बिग बॉसमध्ये परत आणण्याची मागणीही होत आहे. "प्रणित मोरेला परत आणा", "प्रणित मोरे महाराष्ट्राचा वाघ आहे", असं अनेकांनी म्हटलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, प्रणितला डेंग्यू झाल्याने त्याला बिग बॉसमधून एक्झिट घ्यावी लागली आहे. पण, त्याला सीक्रेट रुममध्येही ठेवलं असल्याचं वृत्त आहे. पण, अद्याप याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आलेली नाही. यंदाच्या वीकेंड का वारमध्येच प्रणित मोरेचं बिग बॉसमधून एक्झिट घेण्याचं नेमकं कारण कळू शकेल.