ना कसला गर्व, ना माज! इतकं फेम मिळूनही प्रणित मोरेचे पाय जमिनीवर, 'त्या' व्हिडीओमुळे होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 11:57 IST2025-12-12T11:57:20+5:302025-12-12T11:57:50+5:30
'बिग बॉस १९'मुळे प्रणित मोरे प्रसिद्धीझोतात आला आहे. मात्र असं असलं तरी त्याच्या चेहऱ्यावर गर्व किंवा माज याचा लवलेशही दिसत नाही.

ना कसला गर्व, ना माज! इतकं फेम मिळूनही प्रणित मोरेचे पाय जमिनीवर, 'त्या' व्हिडीओमुळे होतंय कौतुक
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. मराठमोळ्या प्रणित मोरेने त्याच्या स्वभावाने आणि खेळीने सगळ्यांची मनं जिंकून घेतली. प्रणित मोरे 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीचा दावेदार मानला जात होता. पण, त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. 'बिग बॉस १९'मुळे प्रणित मोरे प्रसिद्धीझोतात आला आहे. मात्र असं असलं तरी त्याच्या चेहऱ्यावर गर्व किंवा माज याचा लवलेशही दिसत नाही.
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर प्रणित मोरेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत. इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन प्रणितचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत प्रणित चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. तर काहींना तो सही देत असल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. प्रणितचा हा व्हिडीओ पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत.
कॉमेडियन असलेल्या प्रणित मोरेने 'बिग बॉस १९'च्या घरात एन्ट्री घेताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. सुरुवातीला प्रणित फार खेळत नव्हता. पण, नंतर मात्र त्याने त्याचा गेम दाखवायला सुरुवात केली होती. प्रणितसह गौरव खन्ना, अमाल मलिक, तान्या मित्तल, फरहाना भट यांनी टॉप ५मध्ये स्थान मिळवलं होतं. गौरवने 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं तर फरहाना उपविजेता ठरली.