"मी दिवसातले ३० तास काम करायचे", 'बिग बॉस' फेम अश्नूर कौरचं वक्तव्य, म्हणाली- "६ वर्षींची असताना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 14:48 IST2025-09-03T14:48:26+5:302025-09-03T14:48:55+5:30
अश्नूरने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये ती दिसली आहे. एका मुलाखतीत तिने शूटिंगचा अनुभव सांगताना सलग ३० तास शूटिंग केल्याचा खुलासा केला.

"मी दिवसातले ३० तास काम करायचे", 'बिग बॉस' फेम अश्नूर कौरचं वक्तव्य, म्हणाली- "६ वर्षींची असताना..."
Bigg Boss 19: 'बिग बॉस'चं नवं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यंदाच्या पर्वात टीव्ही अभिनेत्री अश्नूर कौर सहभागी झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच अश्नूर बिग बॉसच्या घरातील एक चर्चेतला चेहरा बनली आहे. अश्नूरने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये ती दिसली आहे. एका मुलाखतीत तिने शूटिंगचा अनुभव सांगताना सलग ३० तास शूटिंग केल्याचा खुलासा केला.
बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अश्नूर कौरने हॉटरफ्लाय या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अभिनेत्रीने सलग ३० तास काम केल्याचं म्हटलं होतं. "मी तेव्हा ६ वर्षांची होते. शोभा सोमनाथ की हा शो मी करत होते. आणि त्यात माझी मुख्य भूमिका होती. तेव्हा मी सलग ३० तास काम केलं होतं. मी खूप थकले होते. मग आईने मला काही वेळ आराम करण्याचा सल्ला दिला. काही तास मी त्या जंगलात व्हॅनिटीमध्ये झोपले होते. प्रोडक्शनवाले व्हॅनिटीबाहेर उभं राहून आमच्या सुरक्षिततेची काळजी घेत होते. त्यानंतर मी पुन्हा शूटिंगला सुरुवात केली", असं अश्नूर कौर म्हणाली.
दरम्यान, २१ वर्षांच्या अश्नूरने वयाच्या चौथ्या वर्षापासूनच अभिनय करायला सुरुवात केली होती. झांसी की रानी, शोभा सोमनाथ की, ना बोले तुम ना मैने कुछ कहा, हातिम, तुम साथ हो जब अपने अशा मालिकांमध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केलं. सुमन इंदोरी, पटियाला बेब्स, ये रिश्ता क्या कहलाता है, किसको पता था या मालिकांमध्येही ती दिसली होती. सध्या ती बिग बॉसचं घर गाजवत आहे.