७ वर्ष डेटिंग अन् दीड वर्षातच संसार मोडला! 'बिग बॉस'फेम अभिनेत्याबद्दल पत्नीने केला धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 13:19 IST2025-09-29T13:11:55+5:302025-09-29T13:19:28+5:30
"त्याचे अनेक मुलींसोबत संबंध ...",बिग बॉस' फेम अभिनेत्याच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

७ वर्ष डेटिंग अन् दीड वर्षातच संसार मोडला! 'बिग बॉस'फेम अभिनेत्याबद्दल पत्नीने केला धक्कादायक खुलासा
Bigg Boss 19 Fame Abhishek Bajaj: छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असणारा शो म्हणजे बिग बॉस. सध्या सगळीकडे 'बिग बॉस हिंदी १९'च्या पर्वाची जोरदार चर्चा सुरु आहे. हा लोकप्रिय शो सुरु होऊन आता जवळपास १ महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. चार आठवड्यापासून घरात शांत बसलेले स्पर्धेक आता अॅक्शन मोडवर आले आहेत. यंदाच्या या पर्वात अनेक लोकप्रिय कलाकार तसंच सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सर सहभागी झाले आहेत. त्यातीलच एक चर्चेत असणारं नाव म्हणजे अभिषेक बजाज. एकीकडे बिग बॉसच्या घरातील त्याची आणि अशनूर कौरच्या मैत्रीची चर्चा होत असताना सध्या अभिनेत्याच्या एक्स पत्नीने त्याच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
अभिषेक बजाज हा विवाहित असून त्याचा घटस्फोट झाला आहे. लग्नाच्या दीड वर्षातच अभिनेत्याने पत्नीसोबत काडीमोड घेतला. त्यात आता अभिनेत्याची पूर्वाश्रमीची पत्नी आकांक्षा जिंदलने त्यांचं नातं तुटण्यामागचं कारण सांगितलं आहे. अभिषेक बजाज आणि आकांक्षा जिंदाल बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं होतं. आकांक्षा जिंदालने अलिकडेच विकी लालवानीला मुलाखत दिली. यादरम्यान तिने अभिषेक बजाजसोबतच्या तिच्या नात्यावर भाष्य केलं.त्यावेळी ती म्हणाली, "माझ्यासाठी सगळ्या गोष्टी बदलल्या आणि मी ते स्वीकारू शकत नव्हते. त्यानं मला फसवलं होतं. शिवाय त्याचं वागणं पाहून मला अंदाज आला होता की तो कधीही बदलणार नाही."
आकांक्षा याचदरम्यान अभिषेकच्या वागणूकीबद्दल म्हणाली, "त्याचे अनेक मुलींसोबत संबंध होते.याबद्दल इंडस्ट्रीतील काही लोकांनी मला सांगितलं देखील होतं. मला काही स्क्रीनशॉट देखील मिळाले. जेव्हा मी अभिषेकला जाब विचारला तेव्हा तो मला चुकीचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होता. असा खुलासा आकांक्षा जिंदालने केला.