फरहानाच्या आईला बी ग्रेड बोलला, अमाल मलिकची वडिलांकडूनच खरडपट्टी, म्हणाले- "एक बाप म्हणून..."
By कोमल खांबे | Updated: October 19, 2025 15:15 IST2025-10-19T15:14:25+5:302025-10-19T15:15:06+5:30
यंदाच्या वीकेंड का वारमध्ये अमालचे वडील आणि प्रसिद्ध गायक डब्बू मलिकही आले होते. डब्बू मलिक यांनी अमालला समज देताना त्याच्या वागणुकीबद्दल खंत व्यक्त केली. यावेळी अमाल आणि डब्बू मलिक भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

फरहानाच्या आईला बी ग्रेड बोलला, अमाल मलिकची वडिलांकडूनच खरडपट्टी, म्हणाले- "एक बाप म्हणून..."
Bigg Boss 19: दिवाळीनिमित्त बिग बॉसने सदस्यांना खास सरप्राइज देत त्यांच्या कुटुंबीयांकडून आलेली पत्र पाठवली होती. हा एक कॅप्टन्सी टास्कही होता. यामध्ये फरहानाने नीलमच्या घरुन आलेलं पत्र फाडून स्वत:ला कॅप्टन्सीचा दावेदार केलं. पण, त्यानंतर घरात मोठा हंगामा झाल्याचं पाहायला मिळालं. राग अनावर झाल्याने अमालने फरहाना जेवत असताना तिचं ताट फेकून दिलं होतं. त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. यामध्ये फरहाना आणि अमालकडून एकमेकांच्या कुटुंबीयांबाबत खूप वाईट पद्धतीने कमेंट केली गेली. अमालने फरहानाच्या आईला बी ग्रेड म्हटलं.
त्यानंतर अमालला प्रचंड ट्रोलही करण्यात आलं होतं. या वीकेंडच्या वारमध्ये सलमान खानने अमाल आणि फरहाना या दोघांचीही कानउघाडणी केली. यंदाच्या वीकेंड का वारमध्ये अमालचे वडील आणि प्रसिद्ध गायक डब्बू मलिकही आले होते. डब्बू मलिक यांनी अमालला समज देताना त्याच्या वागणुकीबद्दल खंत व्यक्त केली. यावेळी अमाल आणि डब्बू मलिक भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.
डब्बू मलिक म्हणाले, "तुझा राग, तुझी लढाई सगळं मान्य आहे. पण, एक वडील म्हणून तुला सांगतो की Under the belt (अयोग्य किंवा नियम मोडून) खेळू नकोस. कोणत्याही स्त्रीबद्दल एकही चुकीचा शब्द बोलू नकोस. महिलांचा अपमान होईल असा एकही शब्द बोलायचा नाही ही मलिक कुटुंबाची शिकवण आहे. तू लढ, भांडण कर, तुला जे करायचंय ते कर... पण तू जे बोलतेस ते Under the belt (अपमानास्पद) असू नये. तुला जिंकून यायचं आहे. डब्बू मलिकचा मुलगा असं वागतो, हे प्लीज माझ्या कपाळावर लिहिलेलं मला नकोय".