"वडिलांनी जन्माआधीच..." क्रिकेटपटूच्या बहिणीला मिळायची 'अशी' वागणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 13:45 IST2025-10-08T13:44:27+5:302025-10-08T13:45:06+5:30
भारताच्या स्टार क्रिकेटपटूची बहीण सध्या चर्चेत आहे.

"वडिलांनी जन्माआधीच..." क्रिकेटपटूच्या बहिणीला मिळायची 'अशी' वागणूक
Cricketer Deepak Chahar Sister In Bigg Boss 19: 'बिग बॉस १९' मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेली अभिनेत्री मालती चहर सध्या जोरदार चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवताच तान्या मित्तलशी पंगा घेत आणि अमाल मलिकच्या ग्रुपमध्ये सामील होत तिने आपला दबदबा निर्माण केला आहे. नुकत्याच एका एपिसोडमध्ये मालतीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल महत्त्वाचा खुलासा केला.
अमाल मलिक आणि मृदुल तिवारी यांच्याशी बोलताना मालती म्हणाली की, तिच्या वडिलांचे तिच्या जन्माआधीपासून एक स्वप्न होते की त्यांना मुलगी व्हावी आणि ती मोठी झाल्यावर आयपीएस अधिकारी बनावी. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बालपणी मालतीवर अनेक बंधने घातलेली होती. मालतीनं सांगितलं, "मला घराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. मला मुलींसारखे कपडे घालण्याचीही मुभा नव्हती. बारावीपर्यंत माझ्या केसांचा बॉयकट होता. जर मी मेंदी लावली, तर थेट कानफटात बसायची. मुलींसारख्या गोष्टी करणं पूर्णपणे बंद होतं".
मालती म्हणाली, "लहानपणापासून मी मुलांच्या संगतीत अधिक राहिले आहे. म्हणजे मी कायम वडिलांबरोबर आणि त्यांच्या मित्रांबरोबरच राहायचे. त्यामुळे पुरुष किंवा मुलांबरोबर राहायला मला कुठलाच संकोच वाटत नाही. त्यांच्याबरोबर मी खूप सहजपणे वावरते".
दरम्यान, घरातील नवीन टास्कमध्ये मालतीला 'चेटकीण'ची भूमिका मिळाली, ज्यात तिला खास शक्ती देण्यात आल्या. या शक्तींचा वापर करत मालतीने फरहाना भटसोबत मिळून बेसिर अली, अश्नूर कौर, प्रणित मोरे, नीलम भट, जीशान कादरी आणि मृदुल तिवारी या स्पर्धकांना नॉमिनेट केले. मालती चाहर ही केवळ अभिनेत्री, मॉडेल आणि कंटेंट क्रिएटर नाही, तर ती भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण आहे. तिचा चुलत भाऊ राहुल चहर देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो.