दुसऱ्या स्त्रीसाठी वडिलांनी कुटुंबाला सोडलं, 'बिग बॉस १९'च्या 'या' स्पर्धकानं मग आईचं दुसरं लग्न लावून दिलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 11:42 IST2025-10-23T11:40:44+5:302025-10-23T11:42:01+5:30
'बिग बॉस १९'च्या 'या' स्पर्धकानं आईचं लावलेलं दुसर लग्न, स्वत:च खुलासा केला

दुसऱ्या स्त्रीसाठी वडिलांनी कुटुंबाला सोडलं, 'बिग बॉस १९'च्या 'या' स्पर्धकानं मग आईचं दुसरं लग्न लावून दिलं!
सलमान खान होस्ट करत असलेला रिअॅलिटी शो 'बिग बॉस १९' सध्या आपल्या स्पर्धकांमुळे चांगलाच चर्चेत आहे. या स्पर्धकांमुळेच शोचा टीआरपी (TRP) वाढत असून, शोमधील प्रत्येक स्पर्धकाचा प्रवास प्रेक्षकांवर एक वेगळी छाप सोडत आहे. यापैकीच एका स्पर्धकाचा वैयक्तिक आयुष्यातील एक अत्यंत भावनिक आणि धाडसी निर्णय सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 'बिग बॉस १९'च्या एका स्पर्धकानं आपल्या आईचं दुसर लग्न लावलं होतं. याबद्दल त्यानं स्वत:च खुलासा केला.
हा स्पर्धक आहे बसीर अली (Baseer Ali), ज्याने आपल्या आईचे दुसरे लग्न लावून दिले होते. 'बिग बॉस १९'चा स्पर्धक बसीर अलीनं 'रोडीज'दरम्यान उघड केलं होतं की त्यानं त्याच्या भावाबरोबर मिळून त्याच्या आईच्या दुसऱ्या लग्न लावलं होतं. २०१७ मध्ये बसीरने 'रोडीज'मध्ये भाग घेतला होता. ऑडिशनदरम्यान, बसीरने खुलासा केला की, जेव्हा तो फक्त पाच वर्षांचा होता तेव्हा त्याचे वडील त्याला दुसऱ्या स्त्रीसाठी सोडून गेले. त्याच्या आईने एकट्याने त्याला आणि त्याच्या मोठ्या भावाला वाढवले. आईला एकटे पाहून, दोन्ही भावांनी तिचे दुसरे लग्न लावून दिले.
'बिग बॉस १९'च्या सुरुवातीला बसीर अलीच्या खेळाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. तो घरात फायनलिस्ट मानला जात होता. गेल्या काही आठवड्यात त्याचा खेळ बदलला आहे. सध्या त्याची शोमधील दुसरी स्पर्धक नेहल चुडासमाबरोबर जवळीक वाढली आहे. प्रेक्षकांना हा लव्ह अँगल किती आवडतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.
बसीर अली कोण आहे?
'बिग बॉस १९'च्या आधी बसीरने अनेक रिअॅलिटी शोमधून स्वत:ची अशी एक वेगळी छाप निर्माण केली आहे. बसीर अली हा २९ वर्षीय मॉडेल, अभिनेता व टीव्ही सेलिब्रिटी आहे. तो हैदराबादचा रहिवासी असून, २०१७ मध्ये 'MTV रोडीज रायझिंग' हा शो जिंकला होता. त्याच वर्षी त्यानं 'स्प्लिट्सव्हिला' सीझन १० देखील जिंकला. त्या शोमध्ये त्याची जोडी नैना सिंगबरोबर होती आणि त्यांनी एकत्रितपणे विजेतेपद मिळवलं. रिअॅलिटी शोमधून नाव कमावल्यानंतर बसीरने अभिनयाकडे मोर्चा वळवला. त्याने झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'कुंडली भाग्य'मध्ये शौर्य लुथरा ही भूमिका साकारली होती.