"हा शो टॉक्झिक...", 'बिग बॉस १९'वर अरमान मलिकचे आरोप, म्हणाला- "अमालला चुकीचं दाखवून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 09:18 IST2025-10-05T09:18:09+5:302025-10-05T09:18:33+5:30
अमालची चुकीची बाजू दाखवल्याचा आरोप त्याचा भाऊ आणि बॉलिवूड सिंगर अरमान मलिकने केला आहे. अरमानने Xवर ट्वीट केलं होतं. पण, नंतर हे ट्वीट त्याने डिलीट केलं आहे.

"हा शो टॉक्झिक...", 'बिग बॉस १९'वर अरमान मलिकचे आरोप, म्हणाला- "अमालला चुकीचं दाखवून..."
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक म्हणजे सिंगर अमाल मलिक. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अमालचे घरातील काही सदस्यांसोबत वाद होताना दिसत आहेत. त्यामुळे अमालला ट्रोलही केलं जात आहे. पण, अमालची चुकीची बाजू दाखवल्याचा आरोप त्याचा भाऊ आणि बॉलिवूड सिंगर अरमान मलिकने केला आहे. अरमानने Xवर ट्वीट केलं होतं. पण, नंतर हे ट्वीट त्याने डिलीट केलं आहे.
अरमानने ट्वीटमध्ये म्हटलं होतं की "ते अशाप्रकारे प्रोमो एडिट करत आहेत ज्यामध्ये अमाल चुकीचा दिसेल. दुसरे त्याला कशाप्रकारे या गोष्टी करण्यासाठी गैरवर्तन आणि प्रोत्साहित करत आहेत. हा शो टॉक्झिक आहे. मला कधीच हा शो आवडला नाही. आणि आवडणारही नाही. या सगळ्यात माझा भाऊ स्वस्थ राहिल आणि समजुतदारपणे वागेल अशी प्रार्थना करतो".
अरमानने हे ट्वीट नंतर डिलीट केलं आहे. दरम्यान, या आठवड्यात अमाल मलिक नॉमिनेटेड आहे. त्याच्यासोबत झीशान कादरी, कुनिका सदानंद, अश्नूर कौर, नेहाल चुडासमा, तान्या मित्तल, मिनल, प्रणित मोरे हे सदस्यही नॉमिनेटेड आहेत. आता या आठवड्यात घरातील कोणाचा प्रवास संपणार हे पाहावं लागेल.