प्रणित मोरेला "Go back to village" म्हणणाऱ्या बसीरवर भडकली अंकिता, म्हणाली- "आम्ही ठरवलं तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:46 IST2025-09-25T18:45:07+5:302025-09-25T18:46:44+5:30
डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवारने प्रणितची बाजू घेत त्याला पाठिंबा देण्यासाठी व्हिडीओ शेअर केला होता. आता प्रणितसाठी अंकिता वालावलकर मैदानात उतरली आहे.

प्रणित मोरेला "Go back to village" म्हणणाऱ्या बसीरवर भडकली अंकिता, म्हणाली- "आम्ही ठरवलं तर..."
'बिग बॉस'च्या घरात अमाल मलिक आणि प्रणित मोरेमध्ये वादावादी झाल्याचं दिसून आलं. या भांडणात बसीर अलीनेही उडी घेतली. अमाल मलिक आणि बसीरने प्रणित मोरेचा अपमान केल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता सोशल मीडियावर प्रणितचे चाहते आणि त्याबरोबरच मराठी कंटेट क्रिएटरही त्याला सपोर्ट करण्यासाठी एकत्र आले आहेत. डीपी दादा म्हणजेच धनंजय पोवारने प्रणितची बाजू घेत त्याला पाठिंबा देण्यासाठी व्हिडीओ शेअर केला होता. आता प्रणितसाठी अंकिता वालावलकर मैदानात उतरली आहे.
अंकिताने बसिर, प्रणित आणि अमाल यांच्या भांडणाची व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. या व्हिडीओत दिसतंय की बसीर प्रणितला म्हणतो, "तू तुझ्या गावी(घरी) जा". यावर अंकिताने त्याचा खरपूस समाचार घेतला आहे. "हा मोठा जसा काय शहरातून आलाय आणि आम्ही गावातून आलोय. गो बॅक टू व्हिलेज म्हणतोस. आमच्या गावातील लोकांनी वोट केलं ना तर त्या वोटसोबत तुला कपडे पाठवून देतील. आणि हिच ती वेळ आहे. अख्ख्या महाराष्ट्राने प्रणितला वोट करा. सगळ्या मराठी लोकांनी, गावातल्या गाववाल्यांनी सगळ्यांनी वोट करा. आम्हाला आता बघायचंच आहे की कोण घरी जातंय".
"बिग बॉसचं घर असंच आहे. आतमध्ये गेल्यावर काय होतं हे मला माहितीये. प्रणितची ही अशीच अवस्था आहे. कारण आपण असे नाही आहोत की जाऊन उगाच काहीतरी किडे करा, मुद्दे बनवा आणि भांडून दाखवा. दिसण्यासाठी काहीतरी वेगळं करा. त्यामुळे प्रणितला सपोर्ट करा", असं अंकिता पुढे म्हणते.
दरम्यान, या आठवड्यात प्रणित मोरे, गौरव खन्ना, मृदुल तिवारी, अश्नूर कौर, आवेज दरबार, निलम गिरी हे स्पर्धक नॉमिनेट आहेत. आता या आठवड्यात कोणाचा प्रवास संपणार आणि कोण घरातून एक्झिट घेणार हे पाहावं लागेल.