"त्याने माझ्यासोबत इतर महिलांनाही फसवलं", 'बिग बॉस' फेम अभिषेक बजाजवर Ex पत्नीचे आरोप, म्हणाली- "२१ वर्षाच्या अश्नूरसोबत तो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:04 IST2025-11-03T16:03:09+5:302025-11-03T16:04:27+5:30
आकांक्षाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने अभिषेक बजाज खोटारडा असल्याचं म्हटलं आहे. त्याबरोबरच घटस्फोट होण्याचं मुख्य कारणही आकांक्षाने या पोस्टमधून सांगितलं आहे.

"त्याने माझ्यासोबत इतर महिलांनाही फसवलं", 'बिग बॉस' फेम अभिषेक बजाजवर Ex पत्नीचे आरोप, म्हणाली- "२१ वर्षाच्या अश्नूरसोबत तो..."
Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरातील अभिषेक बजाज त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अभिषेकने वैवाहिक आयुष्याबद्दल घरातील सदस्यांना खोटं सांगितल्याच्या चर्चा आहे. स्विमिंगपूलमध्ये अश्नूर आणि अभिषेत माइक न घालता अभिनेत्याच्या एक्सबद्दल बोलत असल्याची शंका सलमान खानने वीकेंड का वारमध्ये बोलून दाखवली. गौरव खन्ना आणि अभिषेकमध्येही याबाबत बोलणं झाल्याचं दिसलं होतं. त्यानंतर आता अभिषेकची एक्स पत्नी आकांक्षा जिंदल हिने अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आकांक्षाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने अभिषेक बजाज खोटारडा असल्याचं म्हटलं आहे. त्याबरोबरच घटस्फोट होण्याचं मुख्य कारणही आकांक्षाने या पोस्टमधून सांगितलं आहे. "तो चांगलं असण्याचं फक्त नाटक करतो आणि लोकांना त्याच्याकडून जे ऐकायला हवं असतं तेच तो बोलतो. तो आयुष्यभर खोटच बोलत आला आहे. हेच आमच्या घटस्फोटाचंही मुख्य कारण आहे. त्याने मला आणि इतर अनेक महिलांना दुखावलं आहे. सलमान खान सरांसमोरही खोट बोलण्यात त्याला जराही संकोच वाटत नाही. स्वत:च्या वयाबद्दल आणि वैवाहिक आयुष्याबद्दल खोटं बोलणं यातूनच तो किती खोटारडा आहे हे दिसतं. नॅशनल टीव्हीवर प्रेक्षकांसोबतही तो हेच करत आहे", असं तिने म्हटलं आहे.

त्याबरोबरच आकांक्षाने अश्नूरचं नाव न घेता अभिषेक तिच्यासोबतही खोटं वागत असल्याचं म्हटलं आहे. पुढे ती म्हणते, "गेल्या १५ वर्षांपासून तो हाच खेळ खेळत आहे. बिग बॉसच्या घरातही तो २१ वर्षाच्या मुलीसोबत इतिहासाची पुनरावृत्ती करत आहे. लाज हा शब्द त्याच्या डिक्शनरीमध्ये नसावा. मी कोणताही ड्रामा करण्यासाठी किंवा बदला घेण्यासाठी हे सगळं करत नाहीये. फक्त सत्य समोर यावं, असं मला वाटतं".