Bigg Boss 18: आधी सिद्धार्थ शुक्ला आता करणवीर मेहरा! दोघांच्या नावे आहे 'हा' सेम रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 08:58 IST2025-01-20T08:55:54+5:302025-01-20T08:58:30+5:30

'बिग बॉस १८' चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. करणवीर मेहराने 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. बिग बॉसचा विजेता होताच करणवीरने एक रेकॉर्ड त्याच्या नावावर केला आहे. 

Bigg Boss 18 karanveer mehara becomes 2nd celebrity who win the show after khatron ke khiladi winner | Bigg Boss 18: आधी सिद्धार्थ शुक्ला आता करणवीर मेहरा! दोघांच्या नावे आहे 'हा' सेम रेकॉर्ड

Bigg Boss 18: आधी सिद्धार्थ शुक्ला आता करणवीर मेहरा! दोघांच्या नावे आहे 'हा' सेम रेकॉर्ड

Bigg Boss 18 : 'बिग बॉस १८' चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. करणवीर मेहराने 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांच्यात चुरस होती. विशेष म्हणजे प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा १० मिनिटांसाठी वोटिंग लाईन्स ओपन ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रेक्षकांनी करणवीर मेहराला जास्त वोट देत विजेता केलं. बिग बॉसचा विजेता होताच करणवीरने एक रेकॉर्ड त्याच्या नावावर केला आहे. 

'बिग बॉस १८'ची ट्रॉफी जिंकण्याआधी करणवीर मेहरा 'खतरों के खिलाडी १४'चा विजेता ठरला होता. त्यानंतर त्याने 'बिग बॉस १८'च्या ट्रॉफीवरही नाव कोरलं. 'बिग बॉस' आणि खतरों के खिलाडी अशा दोन रिएलिटी शोचे विजेतेपद मिळवणारा करणवीर मेहरा दुसरा अभिनेता आहे. याआधी सिद्धार्थ शुक्लाने देखील 'बिग बॉस' आणि खतरों के खिलाडी या शोचे विजेतेपद मिळवले आहे. सिद्धार्थ खतरें के खिलाडी ७ मध्ये सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेता होता. त्यानंतर 'बिग बॉस १३'मध्ये त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. 'बिग बॉस १३'चाही सिद्धार्थ विनर होता. 


करणवीर मेहरा हा सुरुवातीपासूनच बिग बॉसमध्ये एक स्ट्राँग स्पर्धक राहिला. त्याची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ होती. याचाच रिझल्ट म्हणजे प्रेक्षकांनी त्याला भरभरुन वोट दिले.  करणवीरला आकर्षक ट्रॉफीसह सुमारे बक्षीस रक्कम म्हणून ५० लाख रुपयांचा चेक मिळाला आहे. 

Web Title: Bigg Boss 18 karanveer mehara becomes 2nd celebrity who win the show after khatron ke khiladi winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.