Bigg Boss 18: अखेर खरा निकाल लागला! करणवीर मेहरा 'बिग बॉस १८'चा विजेता होताच अभिज्ञा भावेची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:08 IST2025-01-20T12:08:07+5:302025-01-20T12:08:23+5:30
करणवीर मेहरा 'बिग बॉस १८' च्या विजेता ठरताच मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेने पोस्ट शेअर केली आहे.

Bigg Boss 18: अखेर खरा निकाल लागला! करणवीर मेहरा 'बिग बॉस १८'चा विजेता होताच अभिज्ञा भावेची पोस्ट
Bigg Boss 18 : 'बिग बॉस १८' चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. करणवीर मेहराने 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांच्यात चुरस होती. विशेष म्हणजे प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा १० मिनिटांसाठी वोटिंग लाईन्स ओपन ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये प्रेक्षकांनी करणवीर मेहराला जास्त वोट देत विजेता केलं. करणवीर मेहरा 'बिग बॉस १८' च्या विजेता ठरताच मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेने पोस्ट शेअर केली आहे.
अभिज्ञाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन करणवीर मेहराला वोट करण्यासाठी आवाहन केलं होतं. त्यानंतर 'बिग बॉस १८'चा विजेता ठरल्यानंतर अभिज्ञाने करणवीरसाठी खास पोस्ट केली आहे. करणवीर मेहराचा फोटो पोस्ट करत तिने 'अखेर खरा निकाल लागला' असं म्हटलं आहे. अभिज्ञा आणि करणवीरने बातें कुछ अनकही सी मालिकेत एकत्र काम केलं होतं.
दरम्यान, करणवीर मेहरा हा सुरुवातीपासूनच बिग बॉसच्या घरातील एक उत्तम स्पर्धक होता. बिग बॉसच्या ट्रॉफीचा तो दावेदार मानला जात होता. त्याची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ होती. म्हणूनच प्रेक्षकांनी त्याला भरभरुन वोट दिले. करणवीरला आकर्षक ट्रॉफीसह सुमारे बक्षीस रक्कम म्हणून ५० लाख रुपयांचा चेक मिळाला आहे.