'तू निघ रे इथून, नाहीतर...'; विकीवर जबरदस्त संतापली अंकिता, चार लोकांत केला पाणउतारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 04:00 PM2023-11-09T16:00:10+5:302023-11-09T16:00:55+5:30

Ankita lokhande: सोशल मीडियावर कायम एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करणारी ही जोडी या घरात गेल्यापासून सातत्याने एकमेकांशी भांडत आहेत.

bigg-boss-17-you-get-out-of-here-ankita-lokhande-got-angry-at-husband-vicky-jain | 'तू निघ रे इथून, नाहीतर...'; विकीवर जबरदस्त संतापली अंकिता, चार लोकांत केला पाणउतारा

'तू निघ रे इथून, नाहीतर...'; विकीवर जबरदस्त संतापली अंकिता, चार लोकांत केला पाणउतारा

छोट्या पडद्यावरील बिग बॉस १७ (Bigg boss 17) हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. हा शो सुरु झाल्यापासून त्यातील स्पर्धकांची एकमेकांसोबत तू-तू-मैं-मैं सुरु झाली आहे. यात खासकरुन अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही जोडी चर्चेत येत आहे. सोशल मीडियावर कायम एकमेकांप्रतीचं प्रेम व्यक्त करणारी ही जोडी या घरात गेल्यापासून सातत्याने एकमेकांशी भांडत आहेत. त्यामुळे त्यांच्या नात्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यामध्येच आता पुन्हा एकदा या जोडीत वाद झाला असून अंकिताने थेट विकीला 'निघून जा' असं म्हटलं आहे.

सध्या या शो चा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये अंकिता आणि अभिषेक एकमेकांशी गप्पा मारत असतात. यावेळी अंकिता, अभिषेकला सुशांत सिंह राजपूतविषयी काही गोष्टी सांगत असते. मात्र, त्यावेळी विकीमध्येच येतो आणि अंकिताची मस्करी करतो.  विकीचं हे वागणं पाहून अंकिता प्रचंड संतापते.

 "माझ्या आणि अभिषेकच्या मध्ये येऊ नकोस. मी शेवटचं सांगतीये. जर पुन्हा तू मध्ये आलास तर बाटलीने डोकं फोडेन", असं म्हणत अंकिता त्याला वॉर्निंग देते. मात्र, तरीही विकी तिची मस्करी करतो. इतकंच नाही तर इशासमोरही तिची खिल्ली उडवतो.

त्याचं वागणं पाहून इशा सुद्धा त्याला 'असं करु नकोस', म्हणून सांगते. त्यावर, "हा कायम असंच करतो. या घराच्या बाहेर सुद्धा तो असंच वागतो. तो त्याच्या मित्रांसमोर असं दाखवतो की कायम माझीच चूक असते. आणि, दुसरीकडे मी कायम माझ्या मित्रमंडळींसमोर याला आदराने वागवते. हे बघ विकी जर तू इथेही असंच वागणार असशील तर तुला ते चांगलंच महागात पडेल. नंतर पश्चात करावा लागेल. तू निघ रे इथून", असं म्हणत अंकिताने त्याला चांगलंच फटकारलं.

दरम्यान, या आठवड्यात 'दिल के मकान'मधून नील भट्ट, ऐश्वर्या, अंकिता लोखंडे हे नॉमिनेट झाले आहेत. तर, दिमाग के मकान येथून मन्नारा आणि नावेद नॉमिनेट झाले आहेत. तसंच दम के मकानमधून अरुण, अनुराग, सनी आणि समर्थ नॉमिनेट झाले आहेत.

Web Title: bigg-boss-17-you-get-out-of-here-ankita-lokhande-got-angry-at-husband-vicky-jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.