"भीगे होंठ तेरे", 'बिग बॉस'च्या घरात विकीचं आयेशाबरोबर फ्लर्ट; अंकिताचा चढला पारा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 15:28 IST2024-01-05T15:25:54+5:302024-01-05T15:28:01+5:30

Bigg Boss 17 : आयेशाला पाहून विकीने गायलं इमरान हाश्मीचं गाणं, अंकिताने पतीला सुनावलं, म्हणाली, "घाणेरडं..."

bigg boss 17 vicky jain flirts with aayesha sings bheege honth tere ankita lokhande lashes out at husband | "भीगे होंठ तेरे", 'बिग बॉस'च्या घरात विकीचं आयेशाबरोबर फ्लर्ट; अंकिताचा चढला पारा, म्हणाली...

"भीगे होंठ तेरे", 'बिग बॉस'च्या घरात विकीचं आयेशाबरोबर फ्लर्ट; अंकिताचा चढला पारा, म्हणाली...

'बिग बॉस हिंदी'चं १७वं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यंदाचा सीझन गाजवत आहेत. पण, घरात आल्यापासून त्यांचे खटके उडत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अंकिता आणि विकीचं घरात भांडण होत आहे. त्यामुळे अंकिता आणि विकीच्या नात्यात दुरावा आल्याचंही बोललं जात आहे. नुकताच 'बिग बॉस'च्या घरातील अंकिता-विकीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. 

विकीच्या 'बिग बॉस'च्या घरातील वागण्यामुळे अंकिताचा संताप झाला आहे. 'बिग बॉस'च्या घरात विकी आयेशाबरोबर फ्लर्ट करताना दिसून आला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गार्डन एरियामध्ये विकी, आयेशा आणि ईशा झोपल्याचं दिसत आहे. बोलता बोलता आयेशाला पाहून विकी इमरान हाश्मीच्या सिनेमातील "भीगे होंठ तेरे" हे गाणं म्हणतो. त्याचं गाणं ऐकून आयेशा म्हणते, "मी स्लीव्हलेस घातलं आहे म्हणून ब्लँकेट घेतलं आहे." त्यावर विकी म्हणतो की तुला काय वाटलं, मी मला हे गाणं का सुचलं असेल? 

विकीचं हे बोलणं ऐकून आयेशा अंकिताला आवाज देते. सर्वप्रकार समजल्यानंतर अंकिताचा पारा चढतो आणि ती विकीवर भडकते. त्याला म्हणते, "असं घाणेरडं कृत्य का करत आहेस? मी ऐकलं आहे. ईशा हा काय बोलला ते मला सांग." त्यावर ईशा "त्याचा तो उद्देश नव्हता," असं म्हणते. तेव्हा ईशाला मध्येच थांबवत अंकिता म्हणते की मी माझ्या नवऱ्याला चांगलंच ओळखते. त्यामुळे तो कोणत्या उद्देशाने बोलला, हे मला माहीत आहे. 

'बिग बॉस'च्या घरातील विकीचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनीही विकीला ट्रोल केलं आहे. दरम्यान, विकी आणि अंकिताने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. विकी एक बिजनेसमॅन असून त्याचा कोळशाचा व्यवसाय आहे. 
 

Web Title: bigg boss 17 vicky jain flirts with aayesha sings bheege honth tere ankita lokhande lashes out at husband