Bigg Boss: सोनिया बन्सलचे मुन्नावर फारुकीवर गंभीर आरोप, म्हणाली, 'त्याने माझा हात पकडला...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 12:18 IST2023-10-30T12:08:52+5:302023-10-30T12:18:48+5:30

घरातून बाहेर येताच सोनियाने कॉमेडियन मुन्नावर फारुकीवर गंभीर आरोप लावलेत.

Bigg Boss 17 Sonia Bansal who comes out of the house makes serious allegations against Munnawar Faruqui | Bigg Boss: सोनिया बन्सलचे मुन्नावर फारुकीवर गंभीर आरोप, म्हणाली, 'त्याने माझा हात पकडला...'

Bigg Boss: सोनिया बन्सलचे मुन्नावर फारुकीवर गंभीर आरोप, म्हणाली, 'त्याने माझा हात पकडला...'

Bigg Boss 17: 'बिग बॉस 17' शोचा सध्या तिसरा आठवडा सुरु आहे. घरात पहिल्या दिवसापासूनच भांडणांना सुरुवात झाली आहे. तर नुकतंच पहिलं एलिमेशनही पार पडलं आहे. सोनिया बन्सल घरातून बाहेर पडली आहे. घरातून बाहेर येताच सोनियाने कॉमेडियन मुन्नावर फारुकीवर गंभीर आरोप लावलेत. यामुळे मुन्नावर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.  

सोनिया बन्सल बॉलिवूड अभिनेत्री आहे. तिने राहुल रॉय आणि शक्ती कपूरच्या '100 करोड' या सिनेमातून पदार्पण केलं. नुकतीच ती बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती. घरातून बाहेर येताच तिने स्टॅण्डअप कॉमेडियन मुन्नावर फारुकीवर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचे आरोप लावले. ती म्हणाली, 'मी मुन्नावरशी खूप कमी बोलायचे. पण एक दिवस त्याने बोलता बोलता माझा हात पकडला. नंतर मी त्याला माझा हात न पकडता दुरूनच बोलण्यास सांगितलं.'

गेल्या आठवड्यात सनी आर्य, सोनिया बन्सल, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, आणि सना रईस हे स्पर्धक घरातून बाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले होते. यामध्ये सोनिया बंसलला सर्वात कमी वोट मिळाले. यामुळे तिला बाहेर पडावं लागलं. यासोबत ती या सिझनमध्ये बाहेर पडणारी पहिली स्पर्धक बनली. 

Web Title: Bigg Boss 17 Sonia Bansal who comes out of the house makes serious allegations against Munnawar Faruqui