Bigg Boss 17 : कधी सुरू होणार बिग बॉस १७? सलमान खानच्या शोबाबत मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 07:22 PM2023-09-06T19:22:28+5:302023-09-06T19:23:05+5:30

'बिग बॉस'च्या नव्या पर्वाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. लवकरच 'बिग बॉस १७' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

bigg boss 17 salman khan shoot promo of the new season know the details | Bigg Boss 17 : कधी सुरू होणार बिग बॉस १७? सलमान खानच्या शोबाबत मोठी अपडेट समोर

Bigg Boss 17 : कधी सुरू होणार बिग बॉस १७? सलमान खानच्या शोबाबत मोठी अपडेट समोर

googlenewsNext

अतिशय वादग्रस्त पण तितक्याच चवीने पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे 'बिग बॉस'. 'बिग बॉस'च्या नव्या पर्वाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. लवकरच 'बिग बॉस १७' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेली कित्येक सीझन बॉलिवूड अभिनेता सलमान खान या शोचं सूत्रसंचालन करत आहे. बिग बॉस १७च्या सेटवरील सलमानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार सलमान खानने 'बिग बॉस १७'चा प्रोमो शूट केला आहे. परंतु, ऑफिशिअली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. बिग बॉसच्या प्रोमोसाठी सलमानने खास केशरी रंगाचा कुर्ता आणि जॅकेट परिधान केलं होतं. त्याबरोबरच त्याने डोक्यावर टोपीही घातली होती. 

Parineeti-Raghav Wedding: आली समीप घटिका! परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढाचं वेडिंग कार्ड समोर

'बिग बॉस १७'ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. ऑक्टोबर महिन्यात 'बिग बॉस'चं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिंगल विरुद्ध कपल अशी यंदाच्या बिग बॉसच्या पर्वाची थीम असणार आहे. यंदाच्या पर्वात अंकिता लोखंडे, विकी जैन, कनिका मान, ऐश्वर्या शर्मा, अभिषेक मल्हान, मनीषा रानी हे कलाकार एन्ट्री घेणार असल्याची चर्चा आहे. 

"....म्हणून मी आईचं नाव लावतो", भूषण प्रधानचा खुलासा, म्हणाला, "लोकांना वाटतं माझ्या आईवडिलांचा घटस्फोट..."

दरम्यान, 'बिग बॉस ओटीटी'च्या दुसऱ्या पर्वालाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. युट्यूबर एल्विश यादव या सीझनचा विजेता ठरला. एल्विशने शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली होती. 

Web Title: bigg boss 17 salman khan shoot promo of the new season know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.