प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा मन्नारा हिच्या समर्थनार्थ मैदानात; थेट शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2024 14:36 IST2024-01-21T14:36:42+5:302024-01-21T14:36:54+5:30

अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहिण मन्नारा चोप्रा चांगलीच चर्चेत आहे.

Bigg Boss 17: Priyanka Chopra’s mother madhu chopra share video to supports Mannara Chopra | प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा मन्नारा हिच्या समर्थनार्थ मैदानात; थेट शेअर केला व्हिडीओ

प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा मन्नारा हिच्या समर्थनार्थ मैदानात; थेट शेअर केला व्हिडीओ

'बिग बॉस 17'चा ग्रँड फिनाले जवळ आला असून स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगली आहे. प्रत्येक सदस्य महाअंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टास्कमध्ये 100 टक्के देत आहे. 'बिग बॉस 17' हा सीझन अनेक कारणांनी चर्चेत राहिला आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहिण मन्नारा चोप्रा चांगलीच चर्चेत आहे. नुकतेचं प्रियांकाची आई मधु चोप्रा या मन्नाराचं समर्थन करताना दिसल्या.  त्यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

व्हिडिओमध्ये मधु चोप्रा म्हणाल्या, 'मन्नारा तु खूप चांगलं खेळत आहे. अंतिम फेरीत पोहोचली, त्यासाठी तुझं अभिनंदन. मला तुझा अभिमान आहे. धैर्य ठेवं आणि खंबीर राहा. तु च्रोपा आहेस हे विसरु नको... शुभेच्छा'. त्याच्या या व्हिडीओवर चाहत्यांनीही मन्नाराला शुभेच्छा दिल्या आहेत. 

तसेच 'बिग बॉस 17' च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये आयशा खान, अंकिता लोखंडे आणि ईशा मालवीय यांनी मन्नाराला ट्रार्गेट केलं. याचा एक व्हिडीओ मन्नारा चोप्राच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला होता. ज्यावर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या. पहिली कमेंट प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा यांनी केली. त्यांनी कमेंटमध्ये लिहिलं, 'अरे देवा! ते इतके उद्धटपणे वागत आहेत'.

यापुर्वी इशा व मन्नाराच्या भांडणाच्या एका व्हायरल व्हिडीओ मन्नारा चोप्राची चुलत बहीण मीरा चोप्रानेही प्रतिक्रिया दिली होती. तिने सोशल मीडियाद्वारे इशाला चांगलंच फटकारलं. मीरानं इशा व मन्नाराचा व्हायरल झालेला व्हिडीओ पोस्ट करत म्हणाली, 'गटार  सदस्याबरोबर गटार  मानसिकता. इशाचं तोंड गटार आहे. पण तू तुझी मर्यादा ओलांडली नाहीस, त्याबद्दल तुझा अभिमान आहे,असं म्हणत तिने बहिणीला पाठिंबा दर्शविला आहे.

'बिग बॉस 17' च्या घरात अंकिता लोखंडे, विकी जैन, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अरुण महाशेट्टी, अभिषेक कुमार हे स्पर्धक आहेत. यांच्यामध्ये तगडी लढाई असल्याचं दिसून येत आहे. प्रत्येक स्पर्धक जीव ओतून ट्रॉफी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. आता बिग बॉसच्या घरातून कोण बाहेर पडणार आणि बिग बॉसची ट्रॉफी कोण उंचावणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  या शोचा ग्रँड फिनाले येत्या 28 जानेवारीला होणार आहे.
 

Web Title: Bigg Boss 17: Priyanka Chopra’s mother madhu chopra share video to supports Mannara Chopra