बिग बॉसच्या घरात मुनव्वर फारुकी ढसाढसा रडला; नक्की काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 18:18 IST2023-10-20T18:18:22+5:302023-10-20T18:18:57+5:30

बिग बॉसच्या घरात मुनव्वर हा आपल्या वडिलांबद्दल बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 

Bigg Boss 17: Munawar Faruqui remembers late father's wish to see him in Bigg Boss, cries recalling his journey | बिग बॉसच्या घरात मुनव्वर फारुकी ढसाढसा रडला; नक्की काय घडलं?

बिग बॉसच्या घरात मुनव्वर फारुकी ढसाढसा रडला; नक्की काय घडलं?

'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस १७'मध्ये या रिएलिटी शोचं स्वरुप पूर्णपणे बदलण्यात आलं आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकारांनी एन्ट्री घेतली आहे.  स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीदेखील आहे. नुकतेच कार्यक्रमाचा एक  व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये मुनव्वर हा आपल्या वडिलांबद्दल बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 

विक्की जैनशी बोलत असताना मुनावर फारुकी त्याच्या दिवंगत वडिलांच्या आठवणीने भावूक झाला. तो म्हणतो, 2018 मध्ये माझं कुटुंब बिग बॉस कार्यक्रम पाहायचे. मी या शोमध्ये जावं अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. आता राहिले नाहीत आणि मी येथपर्यंत पोहचलो आहे.   आज ज्या ठिकाणी मी आहे. तिथपर्यंत पोहचण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला आहे'. वडिल आणि आपल्या प्रवासाबद्दल बोलताना तो आपले अश्रू थांबवू शकला नाही. 


मुनव्वर फारुकी हा लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन आहे. आपल्या विनोदाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणाऱ्या मुनव्वरला वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. हिंदू देवी-देवतांबद्दल आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याबद्दल अपमानकारक वत्तव्य केल्याप्रकरणी मुनव्वर पहिल्यांदा चर्चेत आला होता. मुनव्वर फारुकीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. कंगना रनौतचा 'लॉकअप' हा कार्यक्रम त्याने जिंकला असून आता 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी तो सज्ज आहे.

Web Title: Bigg Boss 17: Munawar Faruqui remembers late father's wish to see him in Bigg Boss, cries recalling his journey