Bigg Boss 17 : टी-शर्ट पकडलं, उशी फेकून मारली अन्...; अभिषेक-तहलकामध्ये जोरदार राडा, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 11:10 IST2023-11-30T11:07:57+5:302023-11-30T11:10:13+5:30

'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांमध्ये वाद होऊन भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. 

Bigg Boss 17 fight between abhishek kumar tahlaka and arun in the house video viral | Bigg Boss 17 : टी-शर्ट पकडलं, उशी फेकून मारली अन्...; अभिषेक-तहलकामध्ये जोरदार राडा, व्हिडिओ व्हायरल

Bigg Boss 17 : टी-शर्ट पकडलं, उशी फेकून मारली अन्...; अभिषेक-तहलकामध्ये जोरदार राडा, व्हिडिओ व्हायरल

'बिग बॉस हिंदी'चं १७वं पर्व पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. कपल विरुद्ध सिंगल थीम असलेल्या 'बिग बॉस'च्या यंदाच्या पर्वात अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांमध्ये छोट्या छोट्या कारणांवरुन खटके उडायला सुरुवात झाली होती. आता 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांमध्ये वाद होऊन भांडण झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचा प्रोमो व्हिडिओ समोर आला आहे. 

या व्हिडिओमध्ये अलार्म वाजला तरी ईशा मालवीय न उठल्यामुळे अरुण माशेट्टी तिला बोलत असल्याचं पाहायला मिळत आहे. झोपू नकोस, असं अरूण ईशाला बोलत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. पण, तरीदेखील ईशा त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा झोपते आणि "मला उठवून दाखव", असं त्याला म्हणते. त्यानंतर ईशा "स्वत: तर दिवसभर झोपलेला असतो", असंही म्हणत असल्याचं दिसत आहे. ईशाच्या या विधानानंतर अरूण भडकतो. त्यानंतर अभिषेक तिथे येतो आणि अरुणला म्हणतो, "ही बोलण्याची चुकीची पद्धथ आहे."

 

त्यानंतर अरुण आणि अभिषेकमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं व्हिडिओत दिसत आहे. ईशा आणि अरुणमध्ये सुरू झालेल्या वादावरुन अभिषेक-अरुणमध्ये भांडण होतं. या भांडणात नंतर तहलका उडी घेतो आणि त्यानंतर वाद इतका पेटतो की मारामारी होण्यापर्यंत गोष्टी घडतात. व्हिडिओत तहलका अभिषेकचं टीशर्ट पकडून धमकावत असल्याचंही दिसत आहे. त्यानंतर अरुणही अभिषेकचं टीशर्ट पकडून त्याला उशी फेकून मारतो. 'बिग बॉस'च्या घरातील भांडणाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  आता यावर 'बिग बॉस' काय अॅक्शन घेणार, हे पाहावं लागेल. 

Web Title: Bigg Boss 17 fight between abhishek kumar tahlaka and arun in the house video viral