खरंच गरोदर आहे अंकिता लोखंडे? 'बिग बॉस'मधून बाहेर आलेल्या सदस्याचा खुलासा, म्हणाला, "ती घरात होणाऱ्या मुलांची नावं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 15:09 IST2023-11-22T15:06:12+5:302023-11-22T15:09:57+5:30

अंकिताच्या प्रेग्नन्सीबाबत 'बिग बॉस'च्या घरातून नुकत्याच बाहेर पडलेल्या नवीद सोलेने मोठा खुलासा केला आहे. 

bigg boss 17 fame navid sole talk about ankita lokhande pregnancy test give big hint | खरंच गरोदर आहे अंकिता लोखंडे? 'बिग बॉस'मधून बाहेर आलेल्या सदस्याचा खुलासा, म्हणाला, "ती घरात होणाऱ्या मुलांची नावं..."

खरंच गरोदर आहे अंकिता लोखंडे? 'बिग बॉस'मधून बाहेर आलेल्या सदस्याचा खुलासा, म्हणाला, "ती घरात होणाऱ्या मुलांची नावं..."

'बिग बॉस हिंदी'चं नवं पर्व दिवसेंदिवस अधिक रंजक होत चाललं आहे. पहिल्या दिवसापासूनच अंकिता लोखंडे 'बिग बॉस'च्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक आहे. 'बिग बॉस १७'मध्ये अंकिता पती विकी जैनसह सहभागी झाली आहे. मध्यंतरी अंकिताने 'बिग बॉस'च्या घरात प्रेग्नन्सी टेस्ट केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे ती खरंच गरोदर आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. अंकिताच्या प्रेग्नन्सीबाबत 'बिग बॉस'च्या घरातून नुकत्याच बाहेर पडलेल्या नवीद सोलेने मोठा खुलासा केला आहे. 

'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडताच नवीद सोलेने 'हिंदुस्तान टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अंकिताच्या प्रेग्नन्सीबद्दल भाष्य केलं. "आतापर्यंत सगळं सकारात्मक पद्धतीने घडत आहे. आणि मी यासाठी उत्साही आहे. बाळाचं नाव ठरवण्यासाठी मदत करण्याचं वचनंही अंकिताने माझ्याकडून घेतलं आहे. हिंदी आणि वेस्टर्न नावांचं फ्युजन करून बाळासाठी नाव ठरवण्याचं प्लॅनिंग आम्ही केलं आहे. माझ्या डोक्यात अंकिताच्या बाळासाठी काही नावं आहेत...पण, योग्य वेळ आल्यावरच मी ती सांगेन," असं नवीद सोले म्हणाला. त्याच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा अंकिताच्या प्रेग्नन्सीबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत. 

दरम्यान, अंकिताने काही दिवसांपू्र्वीच 'बिग बॉस'च्या घरात प्रेग्नन्सी टेस्ट केल्या होत्या. विकीबरोबरच याबाबत बोलतानाही अंकिता दिसली होती. "मी आजारी आहे, असं मला वाटतंय. मला आतून फिलिंग येत आहे. माझी मासिक पाळीही आलेली नाही. मला घरी जायचं आहे," असं अंकिता म्हणाली होती. 

Web Title: bigg boss 17 fame navid sole talk about ankita lokhande pregnancy test give big hint