'बिग बॉस 17' फेम ईशा मालवीय कोटींची मालकिन; जगते राणीसारखं आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 19:07 IST2023-11-02T19:04:40+5:302023-11-02T19:07:09+5:30

'उडारियां' या मालिकेमधून प्रसिद्धीझोतात आलेली ईशा मालवीय सध्या 'बिग बॉस सीझन 17' च्या घरात लॉक आहे.

bigg boss 17' fame isha malviya net worth | 'बिग बॉस 17' फेम ईशा मालवीय कोटींची मालकिन; जगते राणीसारखं आयुष्य!

'बिग बॉस 17' फेम ईशा मालवीय कोटींची मालकिन; जगते राणीसारखं आयुष्य!

'बिग बॉस सीझन 17' हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम सध्या चर्चेचा विषय झाला आहे. 'बिग बॉस 17' शोमध्ये टीव्ही सेलिब्रिटींपासून ते सोशल मीडिया स्टार्सपर्यंत अनेक स्पर्धक सहभागी झाले आहेत. बिग बॉसच्या पहिल्या दिवसापासूनच शो अगदी रंगतदार झाला आहे. 'उडारियां' या मालिकेमधून प्रसिद्धीझोतात आलेली ईशा मालवीय सध्या 'बिग बॉस सीझन 17' च्या घरात लॉक आहे. अभिनेत्री या घरातील तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे.

आज ईशाचा वाढदिवस आहे. 'बिग बॉस सीझन 17' च्या घरात तिनं आपला वाढदिवस साजरा केला. ईशा आज 20 वर्षांची झाली आहे. वयाच्या अवघ्या 20वर्षी ती कोटींची मालकिन आहे. तिच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तिच्याकडे 7 ते 10 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. याशिवाय ईशा सोशल मीडियावरूनही भरपूर कमाई करते. शिवायं, ईशानं स्वप्नोदन,नमक इस्क का, या मालिकांमध्ये काम केलं आहे.

ईशा मालवीयाचा जन्म 2 नोव्हेंबरला मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे झाला. हे तिचे मूळ गावही आहे. येथूनच तिने शालेय शिक्षण पूर्ण केले होते. जेव्हा ईशा मालवीय 13 वर्षांची होती, तेव्हाच तिने मॉडेलिंगमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ईशा सोशल मीडियावरही सक्रिय असते. ईशा मालवीयाने एका मुलाखतीत सांगितले होतं की, तिनं कधीही अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिलं नव्हतं. तिला पायलट व्हायचं होतं.

सध्या ईशा बिग बॉसच्या घरात आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करत आहेत. ईशा मालवीय, समर्थ जुरेल आणि अभिषेक कुमार यांच्या लव्ह ट्रँगल पाहायला मिळतोय. 'उडारियां' मालिकेदरम्यान अभिषेक आणि ईशा दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. पण, त्यांच नात तुटलं. आता ईशा समर्थसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मात्र अभिषेक अजूनही ईशाच्या प्रेमात आहे. त्यामळे शोमध्ये त्यांच्यात लव्ह-हेट रिलेशनशिप पाहायला मिळत आहे. आता या तिघांच नात कोणत्या वळणावर जाऊन थांबत हे येत्या काळात कळेलचं.

Web Title: bigg boss 17' fame isha malviya net worth