"मला अंकितासाठी वाईट वाटतंय", देवोलिनाचं ट्वीट, म्हणाली, "विकीने बिग बॉसमध्ये येऊन..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 12:14 IST2023-11-17T12:14:25+5:302023-11-17T12:14:50+5:30

अंकिताबरोबरची विकीची वागणूक चाहत्यांबरोबर अनेक सेलिब्रिटींनाही खटकत आहे. अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने याबाबत एक ट्वीट केलं आहे. 

bigg boss 17 devoleena bhattacharjee slams vicku jain said i felt bad for ankita lokhande | "मला अंकितासाठी वाईट वाटतंय", देवोलिनाचं ट्वीट, म्हणाली, "विकीने बिग बॉसमध्ये येऊन..."

"मला अंकितासाठी वाईट वाटतंय", देवोलिनाचं ट्वीट, म्हणाली, "विकीने बिग बॉसमध्ये येऊन..."

छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असलेला रिएलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'. यंदाच्या पर्वात मराठमोळ्या अंकिता लोखंडेने पती विकी जैनसह एन्ट्री घेतली. अंकिताला 'बिग बॉस'च्या घरात पाहण्यासाठी चाहते आतुर होते. पण, पहिल्या दिवसापासूनच अंकिता आणि विकीमध्ये 'बिग बॉस'च्या घरात छोट्या गोष्टीवरुनही वाद झाल्याचं दिसून आलं. अंकिता आणि विकीमध्ये 'बिग बॉस'च्या घरात खटके उडत आहेत. अंकिताबरोबरची विकीची वागणूक चाहत्यांबरोबर अनेक सेलिब्रिटींनाही खटकत आहे. अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने याबाबत एक ट्वीट केलं आहे. 

"विकीचा अहंकार त्याच्या हरण्याचं कारण नाही बनलं तर मिळवलं. बिग बॉसनेही त्याला डोक्यावर बसवून ठेवलं आहे. पण, ज्यापद्धतीने बिग बॉसच्या घरात आल्यानंतर तो अंकिताबरोबर वागत आहे, ते निंदनीय आहे. स्वत:ला सिद्ध करण्याच्या नादात विकीने त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा बँड वाजवला आहे. मला अंकितासाठी वाईट वाटत आहे," असं देवोलिनाने ट्वीट करत म्हटलं आहे. 

देवोलिनाआधी काम्या पंजाबीनेदेखील विकी-अंकिताबाबत पोस्ट केली होती. 'बिग बॉस'च्या घरातील अंकिता आणि विकीच्या भांडणाचे व्हिडिओही समोर आले होते. विकी अंकिताला देत असलेली वागणूक चाहत्यांनाही खटकत आहे. त्यामुळे चाहतेही नाराज आहेत. पवित्रा रिश्तामधून घराघरात पोहोचलेल्या अंकिताने २०२१मध्ये विकी जैनशी लग्नगाठ बांधली. विकी एक व्यावसायिक असून त्याचा कोळशाचा फॅमिली व्यवसाय आहे. 

 

Web Title: bigg boss 17 devoleena bhattacharjee slams vicku jain said i felt bad for ankita lokhande