विकीला करायचं नव्हतं अंकिताशी लग्न; जबरदस्तीने बांधलीये अभिनेत्रीसोबत लग्नगाठ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 10:51 IST2024-02-28T10:50:12+5:302024-02-28T10:51:20+5:30

Ankita lokhande: विकीला अंकितासोबत लग्न का करायचं नव्हतं यामागचं कारणही सांगितलं आहे.

bigg-boss-17-contestant-ankita-lokhande-says-vicky-jain-refused-to-marry-her-initially | विकीला करायचं नव्हतं अंकिताशी लग्न; जबरदस्तीने बांधलीये अभिनेत्रीसोबत लग्नगाठ?

विकीला करायचं नव्हतं अंकिताशी लग्न; जबरदस्तीने बांधलीये अभिनेत्रीसोबत लग्नगाठ?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande) सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. अलिकडेच ती आणि तिचा पती बिग बॉसमध्ये झळकले होते.  तेव्हापासून ही जोडी सातत्याने चर्चेत येत आहे. बिग बॉसच्या घरात अंकिता आणि विकी (vicky jain) यांचे सातत्याने वाद सुरु होते. त्यामुळे हा शो संपल्यानंतर ही जोडी एकमेकांसोबत फार काळ एकत्र राहणार नाही असं म्हटलं जात होतं. यामध्येच आता अंकिताने विकीविषयी एक खुलासा केला आहे. विकीला अंकितासोबत लग्न करायचं नव्हतं असा खुलासा तिने एका मुलाखतीमध्ये केला आहे.

अलिकडेच अंकिताने भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या वैवाहिक जीवनाविषयी अनेक खुलासे केले. "मी लग्न करु शकत नाही असं याने सांगितलं आणि तो तिथून निघून गेला. आमच्या दोघांची लाइफस्टाइल खूप वेगळी आहे त्यामुळे त्याने लग्नासाठी नकार दिला होता.तो बिलासपूरमध्ये राहायचा आणि मी इथे मुंबईत. त्याला असं वाटत होतं की त्याने बिलासपूरमधल्याच एखाद्या मुलीशी लग्न केलं पाहिजे," असं अंकिता म्हणाली.

अंकिताने हा खुलासा केल्यावर विकीने सुद्धा त्याच मत मांडलं. अंकिताने मला कधी बोलायची संधीच दिली नाही. त्यामुळे मी बोलूच शकलो नाही. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. ज्यावेळी आम्ही भेटलो त्यावेळी दोघेही लग्न करायच्या मानसिकतेमध्ये नव्हतो.

दरम्यान,  विकी आणि अंकिताच्या लग्नाला विकीच्या आईचाही कडवा विरोध होता. विकीने तिच्यासोबत लग्न करु नये अशी त्यांची इच्छा होती याविषयी त्यांनी पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीमध्येही सांगितलं होतं.

Web Title: bigg-boss-17-contestant-ankita-lokhande-says-vicky-jain-refused-to-marry-her-initially