मस्करी करणं विकीला पडलं महागात; अंकिताने सगळ्यांसमोर नवऱ्याला बडवलं चप्पलेने
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2023 16:01 IST2023-11-22T16:01:33+5:302023-11-22T16:01:56+5:30
Ankita lokhande: विकी सतत खोटं बोलत असल्यामुळे अंकिताने त्याला धडा शिकवला

मस्करी करणं विकीला पडलं महागात; अंकिताने सगळ्यांसमोर नवऱ्याला बडवलं चप्पलेने
छोट्या पडद्यावर सध्या बिग बॉसचं १७ वं (bigg boss 17) पर्व चांगलंच गाजताना दिसत आहे. या पर्वात स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टास्कपेक्षा घरातील सदस्यच जास्त चर्चेत येत आहेत. यामध्येच अभिनेत्री अंकिता लोखंडे (ankita lokhande) आणि विकी जैन (vicky jain) ही जोडी तर प्रेक्षकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू झाली आहे. दिवसेंदिवस या जोडीतील वादविवाद वाढत आहेत. यामध्येच आता अंकिताने सगळ्यांसमोर विकीला चप्पल फेकून मारली. त्यामुळे या दोघांमधील दरी आणखीनच वाढली आहे.
बिग बॉस १७ च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये विकी जैन घरातल्या इतर लोकांसमोर खोटं बोलत होता. त्याचा हा खोटेपणा अंकिताने पाहिला. ज्यामुळे तिला राग अनावर झाला. दिमाग का घर येथे राहणाऱ्या विकीने इशा मालविया आणि अन्य सदस्यांना आपलं जेवण दिलं का? असा प्रश्न मुनव्वर फारुकीने विचारला. त्यावर दिल का घरमध्ये राहणाऱ्या इशाने दम का घरच्या खानजादीने दिमाग रुमच्या सदस्यांनी तयार केलेलं जेवण दिलं. परंतु, इशाचा हा दावा विक्की आणि खानजादी हे दोघं फेटाळून लावतात.
अंकिता लोखंडेचा नवरा आहे टकला? नील भट्टने केली विकी जैनची पोलखोल
घरात जेवणावरुन वाद सुरु असतानाच अंकिता तिथे पोहोचते. तिथे आल्यावर खानजादीला दिमाग रुमच्या सदस्यांचं जेवण जेवताना पाहिल्याचं अंकिता सांगते. पण, अंकिता बोलत असताना विकी तिची मान प कडतो आणि तिला ओढतो. त्याचं हे वागणं पाहून अंकिता त्याला दूर ढकलायचा प्रयत्न करते. पण, तो तिला धरुन ठेवतो. विकीने सुरु केलेल्या मस्करीमुळे अंकिता प्रचंड संतापते. आणि, ती विकीला मारण्यासाठी त्याच्या मागे धावते. पण,तो ऐकूनही थांबत नसल्यामुळे तिने पायातली चप्पल काढली आणि विकीला मारायला सुरुवात केली.