Bigg Boss 16 Promo: तू अंगार, बाकी सब भंगार..., सलमान खानने घेतला मान्या सिंगचा ‘क्लास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2022 16:05 IST2022-10-07T16:02:19+5:302022-10-07T16:05:48+5:30

Bigg Boss 16 Weekend Ka Vaar : ‘बिग बॉस 16’च्या पहिल्या ‘वीकेंड का वार’ची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पहिल्या वीकेंड का वारमध्ये काय होणार? सलमान (Salman Khan ) कोणावर बरसणार? हे जाणून घेण्यास तुम्हीही उत्सुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Bigg Boss 16 Weekend Ka Vaar Salman Khan Angry On Manya Singh Catfight With Sreejita De | Bigg Boss 16 Promo: तू अंगार, बाकी सब भंगार..., सलमान खानने घेतला मान्या सिंगचा ‘क्लास’

Bigg Boss 16 Promo: तू अंगार, बाकी सब भंगार..., सलमान खानने घेतला मान्या सिंगचा ‘क्लास’

Bigg Boss 16 Weekend Ka Vaar  : ‘बिग बॉस 16’च्या पहिल्या ‘वीकेंड का वार’ची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पहिल्या वीकेंड का वारमध्ये काय होणार? सलमान (Salman Khan ) कोणावर बरसणार? हे जाणून घेण्यास तुम्हीही उत्सुक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ‘बिग बॉस 16’चे दोन प्रोमो रिलीज करण्यात आले आहेत. एका व्हिडीओमध्ये सलमान अब्दु रोजिकला गिफ्ट देताना दिसतोय तर दुसऱ्या प्रोमोमध्ये सलमान मान्या सिंग ( Manya Singh) हिला फटकारताना दिसतोय.

अब्दुला सलमानने दिलं खास गिफ्ट

सध्या ‘बिग बॉस 16’मध्ये अब्दु रोजिकची चर्चा आहे. आपल्या कमी उंचीमुळे आणि क्यूटनेसमुळे चर्चेत आलेल्या अब्दुवर पहिल्या वीकेंड का वारमध्ये सलमान ‘मेहरबान’ दिसला. सलमानने अब्दुला एक खास गिफ्ट दिलं. होय, भाईजानने अब्दुला डंबल्स गिफ्ट दिलेत. हे गिफ्ट पाहून अब्दुचा आनंद गगनात मावेनासा झाला.

मान्याला सुनावलं...

इंडियन ब्युटी मान्या सिंग आणि टीव्ही अभिनेत्री सृजिता डे यांच्या शुक्रवारी जोरदार भांडण होताना दिसणार आहे. प्रोमोत या भांडणाची एक झलक पाहायला मिळते. प्रोमोत मान्या सृजिता डे हिला ‘ये गेम खेल रही है, वह इधर का उधर और उधर का इधर करती है,’ असं म्हणते. यानंतर दोघींमध्ये चांगलीच जुंपते. मैं देश की अ‍ॅम्बीसिडर हूं, तू क्या है, सिर्फ टीव्ही अ‍ॅक्ट्रेस, असं मान्या भांडणात भांडणात सृजिताला बोलून जाते. ही कॅट फाईट पाहून सलमान बिथरतो. मान्याला तो चांगलंच सुनावतो. मान्या के हिसाब से वह अंगार है और बाकी सब भंगार है, असं म्हणत तो पहिल्याच वीकेंड का वारमध्ये मान्याचा क्लास घेतो.

या वीकेंड का वारमध्ये सलमान काही सदस्यांचा क्लास घेताना दिसणार आहे तर काही मजेशीर गेम्स खेळताना दिसणार आहे. आज रात्री 9.30 वाजता हा एपिसोड प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Web Title: Bigg Boss 16 Weekend Ka Vaar Salman Khan Angry On Manya Singh Catfight With Sreejita De

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.