Bigg Boss 16 : घडलं एक अन् बिग बॉसने पब्लिकला दाखवलं भलतंच? गौतमने केली पोलखोल... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 18:23 IST2022-11-22T18:21:45+5:302022-11-22T18:23:57+5:30

Bigg Boss 16 : गौतम विजने घराबाहेर पडल्यानंतर खुलासा केला आणि यानंतर सोशल मीडियावर खरं काय? याचा व्हिडीओ व्हायरल झाला...

bigg boss 16 gautam vig reveals shiv thakre come to attack shalin with chair | Bigg Boss 16 : घडलं एक अन् बिग बॉसने पब्लिकला दाखवलं भलतंच? गौतमने केली पोलखोल... 

Bigg Boss 16 : घडलं एक अन् बिग बॉसने पब्लिकला दाखवलं भलतंच? गौतमने केली पोलखोल... 

बिग बॉस 16’च्या (Bigg Boss 16) गेला ‘वीकेंड का वार’ चांगलाच वादळी ठरला होता. या एपिसोडमध्ये सलमान खान भडकल्याचं पाहायला मिळालं होतं. कारण होतं, घरातील राडा. होय, गेल्या आठवड्यात शालीन भनोट (Shalin Bhanot) व एमसी स्टॅन (MC Stan ) यांच्यात जोरदार राडा झाला होता. अगदी प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं होतं. यानंतर सलमानने वीकेंड का वारमध्ये तिघांचा जबरदस्त क्लास घेतला होता. आता भांडण तर दोघांत झालं मग तिघांचा क्लास का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर या भांडणात आणखी एक तिसरी व्यक्ती होती. अर्थात बिग बॉसच्या मेकर्सनी या तिसऱ्या व्यक्तिला मोठ्या शिताफीनं बाजूला ठेवलं. यासाठी त्याचा सीन पूर्णपणे हटवण्यात आला. गौतम विजने घराबाहेर पडल्यानंतर मीडियासमोर हा खुलासा केला आणि यानंतर सोशल मीडियावर खरं काय? याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

काय आहे भानगड
टीना बेडरूम एरियामधून बाहेर येत असताना अचानक तिचा माय मुरगळला होता. शालीन व एमसी स्टॅन तिच्या मदतीसाठी धावले होते. शालीन टीनाचा पाय हाताने ठीक करत असताना एमसी त्याला टोकतो. तिला डॉक्टरांची गरज आहे, असं म्हणतो आणि शालीन बिथरतो. यानंतर दोघांतही जबरदस्त भांडण होतं अगदी प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचतं. या भांडणात शिव ठाकरे खुर्ची घेऊन शालीनला मारायला धावतो. पण शोमध्ये शिवचा हा सीन मोठ्या शिताफीने कट केला गेला. याऊलट शिव तर शालीन व स्टॅनचं भांडण मिटवत होता, असं बिग बॉस कडून सांगितलं गेलं.

गौतम विजने घरातून बाहेर पडल्यानंतर ही गोष्ट मीडियाला सांगितली आणि यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. यात शिव ठाकरे (Shiv Thakare) खुर्ची हातात घेऊन शालीनला मारायला येताना दिसतो. पण शोमध्ये 2 सेकंदाचा हा व्हिडीओ मेकर्सने दाखवलाच नाही.

वीकेंड का वारमध्ये सलमानने म्हणूनच एमसी स्टॅन व शिव ठाकरे दोघांचाही क्लास घेतला होता. तुम्ही बिग बॉसला डब्ल्यूडब्ल्यूई समजता का? एकमेकांना असं मारणं, चिथावणं योग्य आहे का? एकमेकांना मारायचं तर घराबाहेर मारा, असं त्याने बजावलं होतं.

Web Title: bigg boss 16 gautam vig reveals shiv thakre come to attack shalin with chair