Bigg Boss 16: ‘हा’ स्पर्धक होणार ‘बिग बॉस 16’चा विजेता? ट्रॉफीसोबतचा फोटो होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 17:39 IST2023-02-09T17:38:25+5:302023-02-09T17:39:14+5:30
Bigg Boss 16: येत्या १२ तारखेला ‘बिग बॉस 16’ ग्रँड फिनाले रंगणार आहे. साहजिकच बिग बॉसची टॉफी कोण जिंकणार, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.

Bigg Boss 16: ‘हा’ स्पर्धक होणार ‘बिग बॉस 16’चा विजेता? ट्रॉफीसोबतचा फोटो होतोय व्हायरल
छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक वादग्रस्त तितकाच लोकप्रिय शो ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16)चा ग्रँड फिनाले अगदी तोंडावर आला आहे. येत्या १२ तारखेला ‘बिग बॉस 16’ ग्रँड फिनाले रंगणार आहे. साहजिकच बिग बॉसची टॉफी कोण जिंकणार, हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. शालीन भनोट (Shalin Bhanot), अर्चना गौतम (Archana Gautam), एमसी स्टॅन (MC Stan), शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि प्रियंका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे या सीझनमधील टॉप-5 सदस्य आहेत. पण विजेतेपदाच्या शर्यतीत यापैकी केवळ तीन स्पर्धक आहेत. होय, एमसी स्टॅन, शिव ठाकरे व प्रियंका चौधरी चहर यांच्यात तगडी स्पर्धा आहे. अशात आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय.
Three trends running simultaneously .. For me
— Arshi Khan (@Arshikofficial_) February 6, 2023
PRIYANKA OWNS TROPHY pic.twitter.com/WGrFmDvXjj
‘बिग बॉस’ची माजी स्पर्धक अर्शी खान हिने हा फोटो शेअर केला आहे. यात प्रियंका दिसते आहे. खास बात म्हणजे, प्रियंकाच्या हातात ‘बिग बॉस 16’ची ट्रॉफी आहे. या फोटोमुळे प्रियंका हीच ‘बिग बॉस 16’ची विनर ठरणार, असा दावा युजर्स करत आहेत. अर्शीनं या फोटोला दिलेलं कॅप्शनही सूचक आहे. 'तीन ट्रेंड्स सध्या व्हायरल होत आहेत, माझ्यामते प्रियंकानं ट्रॉफी जिंकली आहे, 'असं तिने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
प्रियंका ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) या सिझनमधील स्ट्राँग स्पर्धक आहे. अगदी पहिल्या आठवड्यापासूनच तिने अगदी आक्रमक खेळ खेळला. ती सगळ्यांनाच पुरून उरली. 26 वर्षाच्या प्रियंकाने ‘ये है चाहतें’, ‘परिणीती’ या शोमध्ये काम केले आहे. 'उडारिया' या मालिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली.