अब्दु रोजिकचं लग्न मोडलं, खुलासा करत म्हणाला, "मला अशी व्यक्ती हवी जी मानसिकरित्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 14:33 IST2024-09-18T14:32:41+5:302024-09-18T14:33:45+5:30

मला हे सांगताना अतिशय दु:ख होत आहे की... अब्दु रोझिकने सांगितलं कारण

Bigg Boss 16 fame Abdu Rozik marriage cancelled reveals reason behind it | अब्दु रोजिकचं लग्न मोडलं, खुलासा करत म्हणाला, "मला अशी व्यक्ती हवी जी मानसिकरित्या..."

अब्दु रोजिकचं लग्न मोडलं, खुलासा करत म्हणाला, "मला अशी व्यक्ती हवी जी मानसिकरित्या..."

बिग बॉस १६ फेम दुबईचा अब्दु रोजिकने (Abdu Rozik) काही महिन्यांपूर्वीच मिस्ट्री गर्ल सोबत साखरपुडा केला होता. होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवत त्याने ही न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. यानंतर अब्दूचा कधी निकाह होतो याकडे चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र अब्दूने निकाह रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला.

'इंडिया फोरम' ला दिलेल्या मुलाखतीत अब्दु रोजिक म्हणाला, "मला हे सांगताना अतिशय दु:ख होत आहे की माझा निकाह रद्द झाला आहे. आम्ही आपसी सहमतीने हा निर्णय घेतला आहे. आमच्यामध्ये काही मतभेद होते ज्यामुळे आम्ही निकाह रद्द केला. तुम्हाला सर्वांनाच माहित आहे की मी खूप मेहनती आहे आणि वैयक्तिक आयुष्यात दर दिवशी नवी आव्हानं येतच असतात. मी अशा व्यक्तीशी निकाह करु इच्छितो जी स्ट्राँग असेल आणि येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी मानसिकरित्या तयार असेल."

तो पुढे म्हणाला, "मी जसा आहे तसाच बरा आहे. मी असा का दिसतो हा विचार करुन कधीच दु:खी झालो नाही. मी असाच आनंदी आणि समाधानी आहे. ज्यांच्यासोबत माझं नातं आहे, मैत्री आहे त्यांना मी मनात ठेवलं. त्यामुळे मला आशा आहे आयुष्यात मला प्रेम मिळेल. तुमच्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे."

अब्दु रोजिक बिग बॉस १६ मुळे लोकप्रिय झाला. सलमान खानही त्याला पाहून प्रभावित झाला. सलमानने त्याला सिनेमातही घेतले. बिग बॉसमध्ये अब्दु आणि शिव ठाकरेची चांगली मैत्री झाली. घरातून बाहेर आल्यानंतर त्यांची मैत्री टिकून आहे.

 

Web Title: Bigg Boss 16 fame Abdu Rozik marriage cancelled reveals reason behind it