Bigg Boss 16 : “भाई, बिग बॉस में यहीं कर लेते...”, अंकित गुप्ताचा पबमधला व्हिडीओ पाहून चाहते शॉक्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 12:28 PM2023-01-05T12:28:48+5:302023-01-05T12:29:31+5:30

Bigg Boss 16, Ankit Gupta : ‘बिग बॉस 16’मधून अंकित गुप्ता कधीच आऊट झाला आहे. घरात असताना अंकित अधिकाधिक शांत दिसायचा. दिवसभरात मोठ्या मुश्किलीने फार फार तर दोन-तीन वाक्य बोलायचा. आता याच अंकितचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय...

Bigg Boss 16 Contestant Ankit Gupta Pub Video Goes Viral On Social Media | Bigg Boss 16 : “भाई, बिग बॉस में यहीं कर लेते...”, अंकित गुप्ताचा पबमधला व्हिडीओ पाहून चाहते शॉक्ड

Bigg Boss 16 : “भाई, बिग बॉस में यहीं कर लेते...”, अंकित गुप्ताचा पबमधला व्हिडीओ पाहून चाहते शॉक्ड

googlenewsNext

बिग बॉस 16’मधून (Bigg Boss 1) अंकित गुप्ता ( Ankit Gupta ) कधीच आऊट झाला आहे. घरात असताना अंकित अधिकाधिक शांत दिसायचा. अधिकाधिक वेळ झोपलेला दिसायचा. त्याचा ना कुठला मुद्दा असायचा आणि तो ना कुणाशी भांडायचा. दिवसभरात मोठ्या मुश्किलीने फार फार तर दोन-तीन वाक्य बोलायचा. पण तरिही त्याला भरभरून मतं मिळायची आणि दरवेळी तो नॉमिनेशनमध्ये सुरक्षित व्हायचा. पण अखेर घरातील अन्य सदस्यांच्या वोटिंगच्या आधारावर अंकित बिग बॉसमधून बाहेर पडला. आता याच अंकितचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि या व्हिडीओतील अंकितचं नवं रूप पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ पाहून चाहतेही हैराण झाले आहेत.

व्हिडीओ एका पार्टीचा आहे. अंकित पबमध्ये पार्टी करताना दिसतोय. ‘बिग बॉस 16’मध्ये दिसलेला गौतम विग हाही त्याच्यासोबत आहे. व्हिडीओत अंकित बेधूंद होत नाचताना दिसतोय. अगदी हात वर करून तो बेभान नाचतोय. त्याचं हे रूप चाहत्यांसाठीही अनपेक्षित आहे. बिग बॉसच्या घरात कायम गप्प राहणारा अंकित बाहेरच्या जगात इतका बिनधास्त आहे, हे पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. शिवाय वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत.

प्रियंका नाहीये म्हणून तो स्वातंत्र्य उपभोगतोय, असं एका युजरने या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलंय. पोपट पिंजºयातून बाहेर पडला, आता तो स्वतंत्र आहे आणि याच आनंदात नाचतोय, अशी कमेंट तर अनेकांनी केलं. अरे भावा, हेच बिग बॉसमध्ये केलं असतंस, असं एका युजरने म्हटलं आहे.

अंकितने 2011 मध्ये ‘बालिका वधू’ या मालिकेद्वारे  टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्याने कधीही मागे वळून  बघितले नाही. गेल्या 10 वर्षात त्याने  मालिकांमध्ये काम केलं आहे. ज्यामध्ये  कुछ रंग प्यार के ऐसे भी, साड्डा हक या मालिकांचा समावेश आहे. बेगुसराय या मालिकेतल्या गर्व ठाकूर या भूमिकेसाठीही तो प्रसिद्ध आहे.

Web Title: Bigg Boss 16 Contestant Ankit Gupta Pub Video Goes Viral On Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.