किस कार्टुन को बुला लिया? करण जोहर ‘बिग बॉस 15’ होस्ट करणार म्हणताच भडकले युजर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 10:35 IST2021-07-25T10:33:44+5:302021-07-25T10:35:46+5:30
Bigg Boss 15 : ओटीटीवर हा शो करण जोहर होस्ट करणार असल्याची बातमी आली आणि सोशल मीडियावर पुन्हा ‘राडा’ सुरू झाला.

किस कार्टुन को बुला लिया? करण जोहर ‘बिग बॉस 15’ होस्ट करणार म्हणताच भडकले युजर्स
‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) येणार म्हटल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण अशात ओटीटीवर हा शो करण जोहर (Karan Johar) होस्ट करणार असल्याची बातमी आली आणि सोशल मीडियावर पुन्हा ‘राडा’ सुरू झाला. ओटीटीवर करण जोहर हा शो होस्ट (Bigg Boss new host) करणार हे ऐकताच अनेक चाहते संतापले आणि त्यांनी करणला ट्रोल करायला सुरूवात केली.
काहींनी करण जोहर हा शो होस्ट करणार म्हटल्यावर आनंद व्यक्त केला. पण अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. अनेकांनी तर करण जोहर हा शो होस्ट करणार असेल तर आम्ही ‘बिग बॉस 15’वर बहिष्कार टाकू, असा थेट इशाराच दिला. अनेकांनी ओटीटीवर ‘बिग बॉस 15’ सिद्धार्थ शुक्लानं होस्ट करावा, अशी मागणी लावून धरली.
WTH kis Cartoon ko bula lia show host karne ke liy 🌝
— 𝗥𝗶𝗮 𝗝𝗵𝗮🐬 (@RiaJhaa) July 24, 2021
#BigbossOTT#BiggBoss15pic.twitter.com/1Bqa1gNPzR
अशात सोशल मीडियावर करण जोहरला ट्रोल करतानाचे भन्नाट मीम्स व्हायरल झालेत. करण जोहर बिग बॉस ओटीटी होस्ट करत असेल तर याची अवस्था रणबीर कपूरच्या ‘बॉम्बे वेल्वेट’पेक्षाही वाईट होईल, असं एका युजरनं लिहिलं. तर मुव्ही माफिया करण जोहरला आता शो सुद्धा मिळू लागले, असं म्हणत एका युजरनं आपली नाराजी व्यक्त केली. करण जोहरपेक्षा रोहित शेट्टीला होस्ट बनायचं असतं, अशी कमेंट एका युजरनं केली.
#KaranJohar to host #BiggBossOTT.
— Soham Naskar (@SohamNaskar) July 24, 2021
Meanwhile Bigg Boss fans: pic.twitter.com/9IS9POynkb
Karan johar is hosting #bigbossOTT.... All the more reasons to stop watching BigBoss!
— Nisarg Pandya (@ChiefGroovy) July 24, 2021
#KaranJohar se acha #RohitShetty ko banadete host😏#BiggBossOTT
— Sai99 (@Sai9907) July 24, 2021
Movie mafia#KaranJohar
— Shweta Sri🇮🇳 (@ShwetaSri13) July 24, 2021
Getting shows even now???
Let's #BoycottOTT platforms too#BoycottBollywood
After trending #KaranJohar#bigbossOTT
— ak_memes07🇮🇳 (@memesbuzzs) July 24, 2021
Memer*👇😂😂😂
Who is better?
1. 2😹😹😁 pic.twitter.com/s1C3tSaiop
आईचं स्वप्न पूर्ण झालं..
प्रेक्षक नाराज असले तरी ओटीटीवरचा बिग बॉसचा 15 वा सीझन होस्ट करायला मिळणार म्हणून करण जोहर जाम खूश आहे. मी आणि माझी आई बिग बॉसचे खूप मोठे फॅन आहोत. आम्ही बिग बॉस आतापर्यंत एका दिवसासाठीही मिस केलेलं नाही. एक प्रेक्षक म्हणून खूप मनोरंजन करणारा कार्यक्रम आहे. प्रेक्षकांसोबत शो होस्ट करणं हे मी नेहमीच एन्जॉय केलं आहे. आता बिग बॉस ओटीटीसोबत... हे निश्चितपणे ओव्हर द टॉप असेल, असं करण जोहरनं म्हटलं आहे.